Gautam Adani  sakal media
देश

5G स्पेक्ट्रमसाठी चौथा अर्ज अदाणींचाच; अधिकृत यादी जाहीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी हे दोघे उद्योगपती गुजरातचे आहेत. आतापर्यंत दोन्ही उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. दोघांमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. मात्र अदाणी आणि अंबानी यांच्यात टेलिकम्युनिकेश क्षेत्रात थेट स्पर्धा होणार असं चित्र आहे. (Gautam adani vs Mukesh Ambani news in Marathi)

दूरसंचार विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार 600 मेगाहर्ट्झ, 700 मेगाहर्ट्झ, 800 मेगाहर्ट्झ, 900, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 2500 MHz, 3300 MHz आणि 26 GHz मेगाहर्ट्झमध्ये स्पेक्ट्रमच्या हक्कांसाठी 5G लिलावात सहभागी होण्यासाठी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम, व्होडाफोन आयडिया लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.

दूरसंचार विभागाने म्हटलं की "ही यादी केवळ माहितीसाठी आहे आणि कोणत्याही प्रकारे हे सूचित करत नाही की या अर्जांवर प्रक्रिया केली गेली आहे किंवा ते आधीच पात्र झाले आहे.

दरम्यान 5G लिलाव 26 जुलैपासून सुरू होणार आहे. लिलावातील विजेत्याला 20 वर्षे स्पेक्ट्रम वापरण्याचा अधिकार मिळणार आहे. सरकार एकूण 72,097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. त्याची किंमत सुमारे 4.3 लाख कोटी रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT