RT PCR  esakal
देश

Karnataka | खोट्या RT-PCR रिपोर्टप्रकरणी चौघांना अटक

देशात आजपर्यंत 52 जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे.

निनाद कुलकर्णी

बंगळुरू : भारतात आढळलेल्या पहिल्या ओमिक्रॉन रूग्णाला खोटा RT-PCR रिपोर्ट दिल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Four people arrested for providing false RT-PCR report in Karnataka) दरम्यान, देशात कर्नाटकमध्ये दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर देशात आजपर्यंत 52 जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. (Omicron Cases IN India)

20 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेतून भारतात गाखल झालेल्या 66 वर्षीय प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. (First Omicron Case Recorded In Karnataka) तसेच त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. (False RT-PCR Test In Karnataka Lab)

दरम्यान संबंधित व्यक्तीने 23 नोव्हेंबर रोजी खासगी लॅबमधून कोरोना टेस्ट केली. त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर या व्यक्तीने अटक करण्यात आलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला, त्यानंतर या भामट्यांनी संबंधित व्यक्तीला शहरातील एका खासगी प्रयोगशाळेत जाऊन बनावट आरटी-पीसीआर अहवाल तयार करून घेतला. 26 नोव्हेंबरला रिपोर्ट मिळाल्यानंतर लागण झालेल्या व्यक्तीने या रिपोर्टच्या आधारे 28 नोव्हेंबर रोजी दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला होता.

तक्रारीनंतर कारवाई

या सर्व प्रकरणावर ब्रुहत बेंगळुरू महानगरपालिकेच्या (BBMP) वैद्यकीय अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानतर आज कर्नाटक पोलिसांनी खोटा कोरोना रिपोर्ट दिल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ( Karnataka Police Arrest 4 people for false RT-PCR report)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT