बंगळुरू : भारतात ओमिक्रॉनने (India Omicron Cases) शिरकाव केला असून महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकात दोन रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकाने ६६ वर्षीय रुग्णाने देश सोडला असून दुसरा बंगळुरूतील एक सरकारी डॉक्टर आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (India Corona Cases) आली आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर असून चिंता वाढली आहे.
बंगळुरूतील या डॉक्टरचे लसीकरण पूर्ण झाले होते. त्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता. त्यांना २१ नोव्हेंबरला अंगदुखी आणि हलका ताप होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने हे जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले असता त्यांना ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे समजले. त्यांना तीन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता त्यांचे १३ प्राथमिक आणि दुय्यम २५० संपर्क सापडले आहेत. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जात असून त्यापैकी ५ जणांना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचे नमुने हे जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. कर्नाटकमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तसेच कर्नाटक महाराष्ट्राच्या शेजारी असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर देखील तपासणी केली जात आहे.
एका रुग्णाने सोडला देश -
कर्नाटकात सापडलेला ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण हा ६६ वर्षीय असून तो दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता. तसेच त्याचे लसीकरण पूर्ण झाले होते. मात्र, बंगळुरूमध्ये पोहोचल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली असात तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले. एकाच आठवड्यात एका खासगी लॅबमधून कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आणि तो दुबईला रवाना झाला. त्यानंतर २४ प्राथमिक आणि २४० दुय्यमरित्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चाचणी केली असता ते निगेटिव्ह आढळून आले. मात्र, दुसरा ४६ वर्षीय डॉक्टरला ओमिक्रॉनची लागण कशी झाली? हे अद्याप समजू शकले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.