Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : राहुल यांचा नवा पत्ता... ५; सुनहरी बाग

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीतील ५, सुनहरी बाग हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नवा पत्ता असण्याची शक्यता आहे. आपल्या निवासस्थानासाठी त्यांनी ५, सुनहरी बाग या बंगल्याची निवड केल्याची माहिती आहे.

आज प्रियांका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या सहकाऱ्यांनी या बंगल्याची पाहणी केली. हा बंगला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान १०, जनपथ तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या १०, राजाजी मार्ग बंगल्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

राहुल गांधी यांनी मोदी आडनावांवरून केलेल्या टीकेमुळे मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना २३ मार्च २०२३ रोजी दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते आणि त्यांना १२, तुघलक लेन बंगला सोडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार राहुल गांधी यांनी २२ एप्रिल रोजी हा बंगला सोडला. ते काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ या निवासस्थानी राहण्यास गेले होते. सूरत न्यायालयाच्या निकालाविरोधात काळात राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व कायम राहिले. त्यांना पुन्हा १२, तुघलक लेन बंगला देऊ करण्यात आला.

१२, तुघलक लेन बंगल्यात राहुल गांधी खासदार म्हणून २००४ पासून १९ वर्षे राहिले. पण तो बंगला पुन्हा घ्यायचा नाही असे ठरवून त्यांनी २०२३ च्या उत्तरार्धात ओसाड पडलेल्या ७, सफदरजंग लेन बंगल्याचीही पाहणीही केली होती. पण वेळेत दुरुस्ती शक्य नसल्यामुळे त्यांनी त्याचाही नाद सोडून दिला. अठराव्या लोकसभेवर पुन्हा निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा सफदरजंग लेन भागात वास्तव्यासाठी स्वारस्य दाखवले होते. पण आता त्यांनी उद्योग भवन ते कृष्ण मेनन मार्गदरम्यानचा ५, सुनहरी बाग बंगला पसंत केल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभेचे पाचवेळचे खासदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांना माजी केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेच्या आवास समितीने या बंगल्याची शिफारस केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT