Online Frauds: सध्या जगात वेगाने ऑनलाइन व्यवहार सुरू झाल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढू लागल्या आहे. यामुळेच ऑनलाइन पेमेंट करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपण बातम्यांमध्ये अनेकदा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाचतो, बघत असतो. अनेकदा आपल्या आजूबाजूच्या लोकांचीही अशाच पध्दतीने ऑनलाइन फसवणूक झाल्याचे दिसून येत असते.
भारतातील एकूण फसवणुकीपैकी 57 टक्के फसवणूक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे होते आणि 26 टक्के भारतीय संस्थांना अशा घोटाळ्यांमुळे 1 डॉलर दशलक्षपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशी माहिती वित्तीय सल्लागार सेवा कंपनी प्राइसवॉटरहाऊस कूपर्स (PwC) च्या नवीन अहवालातून समोर आली आहे.
द न्यू फ्रंटियर ऑफ फ्रॉड इन इंडिया या शीर्षकाचा अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला आणि 'प्लॅटफॉर्म्स: द न्यू फ्रंटियर ऑफ फ्रॉड इन इंडिया' या शीर्षकाच्या अहवालांची ही दुसरी आवृत्ती आहे.
पहिल्या आवृतीमध्ये सर्व प्रकारच्या फसवणुकीवर आणि कंपन्यांकडून होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांवर आधारीत होती, तर दुसऱ्या आवृतीचा भाग "प्लॅटफॉर्म फसवणूक" वर केंद्रित आहे, हा भारतीय कंपन्यांमध्ये झालेल्या फसवणुकीचा सर्वात मोठा स्रोत आहे.
सोशल मीडिया, एंटरप्राइझ आणि ई-कॉमर्सशी संबंधित फसवणूक यासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे होणार्या 'प्लॅटफॉर्म फ्रॉड' असे अहवालात वर्णन केले आहे.
हा अहवाल भारतभरातील 111 संस्थांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे, ज्यात तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, बँकिंग आणि भांडवली बाजार, ग्राहक उत्पादने, शिक्षण, आरोग्यसेवा आणि औद्योगिक उत्पादने आणि उत्पादन यासारख्या उद्योगांचा समावेश आहे.
अहवालानुसार, अर्ध्या कंपन्यांची उलाढाल 1 बिलियन डॉलरपेक्षा जास्त होती. ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून होणाऱ्या फसवणूकीत कोविड काळापासून वाढ झाली आहे, कारण रिमोट वर्क, ई-कॉमर्स डिलिव्हरी अॅप्लिकेशन्स आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट - या सर्वांचा वापर झपाट्याने वाढला आहे.
परदेशातील कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्या प्लॅटफॉर्म फसवणुकीला अधिक बळी पडत आहेत. PwC इंडियाचे फॉरेन्सिक सर्व्हिसेसचे भागीदार आणि प्रमुख पुनीत गारखेल म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहक आणि संस्था वाढत्या प्रमाणात नवीन प्लॅटफॉर्म स्वीकारत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.