58th Jnanpith Award for the year 2023 has been awarded to Jagadguru Swami Rambhadracharya for Sanskrit and Shri Gulzar for Urdu  
देश

58th Jnanpith Award : गुलजार यांच्यासह स्वामी रामभद्राचार्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

58th Jnanpith Award : 2023 सालचा 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी आणि गुलजार यांना उर्दूसाठी प्रदान करण्यात आला आहे.

रोहित कणसे

58th Jnanpith Award for the year 2023 Latest News : प्रसिद्ध उर्दू गीतकार आणि कवी गुलजार आणि संस्कृत अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येणार आहे. निवड समितीने ही माहिती दिली आहे. दोन्ही दिग्गज आपापल्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहेत.

गुलजार यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी लिहिण्याबरोबरच गझल आणि कविता क्षेत्रात मोठी ख्याती मिळवली आहे. त्याचबरोबर जन्मापासून दिसत नसतानाही जगद्गुरु रामभद्राचार्य हे संस्कृत भाषा आणि वेद-पुराणांचे मोठे अभ्यासक आहेत.

गुलजार हे हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. ते या काळातील सर्वोत्कृष्ट उर्दू कवींपैकी एक मानले जातात. यापूर्वी त्यांना २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध कामांसाठी त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

तसेच चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरू, शिक्षक आणि १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. हा पुरस्कार (२०२३ साठी) संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT