upsc failed rajat sambyal  sakal
देश

११ गुणांनी हुकली UPSC ची परिक्षा ': ६ वेळा अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचे ट्विट व्हायरल

१० वर्षांची मेहनत मातीमोल झाल्याने विद्यार्थ्याचे सोशल मिडीयावर व्यक्त केली खदखद

दिपाली सुसर

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित 2021 (CSE) मधील नागरी सेवा परीक्षांचा निकाल सोमवारी, 30 मे रोजी जाहीर झाला. निकाल लागताच परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांसाठी सोशल मिडियावर तसेच इतर समाज माध्यमवर अभिनंदनाच्या संदेशांचा वर्षाव सुरू झाला.

अनेक विद्यार्थ्यांनी अनेक प्रयत्नांनंतर परीक्षा उत्तीर्ण केली पण काही उमेदवार असे होते जे अजूनही परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाहीत. अशाच एका इच्छूकाने 10 वर्षांच्या मेहनतीनंतरही परीक्षा कशी उत्तीर्ण होऊ शकली नाही हे मनातील धग ट्विटरवर ट्विट करत व्यक्त केली.

रजत संब्याल ट्विटमध्ये लिहतात की "माझी 10 वर्षांची मेहनत मातीमोल झाली. मी यूपीएससी परिक्षेकरीता 6 वेळा प्रयत्न केले. 3 वेळा प्रिलिम्स अयशस्वी झाले. 2 वेळा मुख्य परीक्षा अयशस्वी झाले. माझ्या शेवटच्या प्रयत्नात, काल मुलाखतीत कमी गुण मिळाल्याने माझा तोही प्रयत्न फसला. 11 गुणांनी नापास झालो."

अनेकवेळा, परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे लोकांचा धीर सुटतो. या ट्विटमध्ये संब्यालची मार्कशीट देखील होती जी ज्यात स्पष्ट दिसुन येते की त्यांना एकूण ९४२ गुण मिळाले आहे.

संब्यालच्या ट्विट खाली अनेकांना प्रतिक्रिया दिल्या. आयपीएस हरीश पांडे लिहतात की, "धीर सोडू नका. शेवटी ती फक्त नोकरीची मुलाखत आहे. पुढे जा. या प्रवासात तुम्ही जे शिकलात ते तुमच्या सोबत राहते"

आयआरएस विकास प्रकाश सिंग लिहितात, "तुम्ही मुलाखतीच्या टप्प्यावर पोहोचला आहात हे सिद्ध करते की तुमच्यात धैर्य आणि दृढनिश्चय आहे, यापुढे तुम्ही कोणतेही करिअर निवडल्यास ते तुम्हाला खूप मदत करेल. ऑल द बेस्ट!"

रिटा लिहितात, "कोणतीही परीक्षा माणसाची खरी कुवत ठरवू शकत नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवला असे समजू नका. हे ज्ञान आणि संपूर्ण अनुभव तुमचे भावी जीवन घडवण्यासाठी सर्वात मौल्यवान सिद्ध होईल. जेव्हा तुम्ही सर्वात यशस्वी असाल तेव्हा तुम्हाला ते चुकवणार नाही. वैयक्तिक अनुभवावरून सांगतो. ऑल द बेस्ट!"

आय.ए.एस दिव्यांशु निगम लिहितात, "तुम्हाला अधिक ताकद मिळो! आयुष्यात नेहमीच प्रत्येकासाठी काहीतरी चांगले लिहिलेलं असते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT