covid center.jpg 
देश

भारतीयांमध्ये चीडचीड, नौराश्य, काळजीची लक्षणं; कोविडच्या वातावरणाचा परिणाम - सर्व्हे

एखाद्या वणव्याप्रमाणं कोविडचा संसर्ग भारतात वाढतच चालला आहे, याचा अनेकांवर मानसिकदृष्ट्या परिणाम झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एखाद्या जंगलात वणवा लागावा त्याप्रमाणं सध्या भारतात कोविडचा संसर्ग (Covid 19 wreaks havoc ) पसरतच चालला आहे. दरम्यान, भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता, निराशा आणि चिडचिड (anxious, depressed, and angry) वाढल्याचं एका सर्व्हेक्षणातून (Survey) दिसून आलं आहे. ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांच्या तुटवड्यामुळे आरोग्य सुविधांची झालेली दमछाक यामुळे भारतात अभूतपूर्व वैद्यकीय संकट (Medical Crisis) निर्माण झालं आहे, याचाही नागरिकांवर मोठा परिणाम झाला आहे. लोकल सर्कल (Local Circle) या कंपनीने याबाबत एका प्रश्नावलीद्वारे सर्व्हेक्षण केलं आहे. कोविड महामारीशी लढताना अनेक जण मानसिकदृष्ट्या तणावाखाली आहेत. ही परिस्थिती हाताळण्यासाठी ते पूर्णपणे सरकारी भूमिकेवर अवलंबून आहेत, असंही या सर्व्हेतून समोर आलं आहे. (61 percent Indians angry and depressed as Covid 19 wreaks havoc says Survey)

६१ टक्के भारतीयांमध्ये चिडचिड, नैराश्य, नाराज आणि काळजीची लक्षणं

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशव्यापी भीती निर्माण केली आहे. दररोज सुमारे ४ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत असल्याने या भीतीमध्ये भरच पडली आहे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये बेड्सची, औषधांची आणि ऑक्सिजनची कमतरता याचा लोकांवर मोठा मानसिक परिणाम होत असल्याचं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.

कोविडची दुसरी लाट आल्यानंतर गेल्या दोन महिन्यात अनेकांचा अभ्यास करण्यात आला यामध्ये २३ टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांच्यामध्ये चिंतेचं आणि भीतीची भावना आहे. तर ८ टक्के लोकांनी सांगितलं की, ते निराश आणि दुःखी आहेत. २० टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांच्यामध्ये नाराजी आणि चिडचिड वाढली आहे. तर केवळ ७ टक्के लोकांनी आपण शांत आणि शांततापूर्ण अवस्थेत असून या परिस्थितीतून बाहेर पडण्याबाबत आशावादी आहोत, असं म्हटलं आहे. एकूणच या सर्व्हेक्षणातून असं दिसून आलंय की, ६१ टक्के भारतीयांमध्ये चिडचिड, नाराजी, नैराश्य आणि काळजीची लक्षण आहेत. यासाठी लोकल सर्कल्सने प्रश्नावली तयार केली होती त्याला ८,१४१ जणांनी प्रतिसाद दिला.

दुसरी लाट हाताळण्यात भारत योग्य ट्रॅकवर आहे का?

या सर्व्हेक्षणात दुसरा प्रश्न असाही विचारण्यात आला की, दुसरी लाट हातळण्यात भारत योग्य ट्रॅकवर आहे की नाही? या प्रश्नाच उत्तर देताना ४१ टक्के नागरिकांनी नाही असं उत्तर दिलं. तर १४ टक्के लोकांनी या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं. या प्रश्नावर ८,३६७ लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञ मंडळी कोरोनाच्या या स्थितीवर नियंत्रण मिळवतील का? या प्रश्नावर १८ टक्के लोकांना प्रचंड विश्वास आहे. इतर २५ टक्के लोकांमध्ये थोडासा विश्वास आहे तर २८ टक्के लोकांनी खूपच कमी विश्वास आहे. आणि २३ टक्के लोकांना तज्ज्ञांवर आजिबात भरवसा नाही.

अंतिमतः या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष असा आहे की, देशातील कोविडच्या संकटामुळे ६१ टक्के भारतीय रागीट, नाराज, निराश आणि काळजीत असल्याचं दिसून आलं आहे. तसेच देशभरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की, भारत दुसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी योग्य ट्रॅकवर आहे. तर ५१ टक्के नागरिकांना या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात तज्ज्ञांना यश मिळेल की नाही याची अद्याप खात्री नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT