दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह देशातील 13 राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय कोळशाच्या टंचाईमुळे अनेक राज्यांमध्ये वीज संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, यूपीमध्ये वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 670 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (670 Passenger Train Trips Cancelled to Make Way for Speedy Coal Supply)
औष्णिक वीज केंद्रांसाठी पुरवल्या जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालगाड्यांना सहज मार्ग मिळावा तसेच कोळसा वेळेवर पोहोचता यावा यासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.
देशातील वीज संकटावर केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, रशियाकडून होणारा गॅस पुरवठा बंद झाला आहे. तथापि, औष्णिक ऊर्जा केंद्रात 21 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. जो दहा दिवस पुरेल. कोल इंडियासह, भारतात एकूण 3 दशलक्ष टनांचा साठा आहे. हा 70 ते 80 दिवसांचा साठा आहे. मात्र, सध्याची परिस्थिती स्थिर आहे.
सध्या दैनंदिन वापराच्या 2.5 अब्ज युनिट्सच्या तुलनेत सुमारे 3.5 अब्ज युनिट वीजनिर्मिती होते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, शेवटच्या दिवसात उष्णतेसोबतच विजेची मागणीही वाढली आहे. आमच्याकडे 10-12 दिवसांचा कोळशाचा साठा आहे. मात्र, त्यानंतरही वीज प्रकल्प बंद होण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याची कबुली दिली होती. ते म्हणाले होते, रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाला आहे.
गेल्या वर्षी, काही राज्यांमध्ये, विशेषत: दिल्ली आणि पंजाबमध्ये अशाच प्रकारचे ऊर्जा संकट उद्भवले होते. त्यावेळी कोळसाला फटका बसला होता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.