narendra modi 
देश

Independence Day: PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वातंत्र्य दिवशी काय घोषणा करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक विषयांना हात घातला. त्यांनी कोरोना योद्धांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच ऑलिम्किक पदत विजेत्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाचवण्याचे आवाहन केले. त्यांनी छोट्या शेतकऱ्यांबाबत चिंता व्यक्त करत एक योजना आणणार असल्याचं जाहीर केलं. तसेच येत्या काळात 75 वंदे भारत रेल्वे धावणार असल्याचं म्हटलं. भारताला उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करत आत्मनिर्भरतेचा नारा त्यांनी दिला. ग्नीन हायड्रोज मिशनची घोषणा त्यांनी घोषणा केली. मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे आपण पाहूया... (75th independence day Latest News)

1. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नामुळे देश विषाणूशी लढा देत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंबाबत गौरवोद्गार काढले. त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

2. देशात लस निर्माण झाली नसती तर काय झालं असतं? देशात सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात सुरु करण्यात आली. ५४ कोटी लोकांनी लस घेतली आहे. कोविन अॅप डिजिटल व्यवस्था जगाला आकर्षित करत आहे. आपल्या देशात मृत्यूदर कमी आहे. पण, हे पाठ झोपटून घेण्याची गोष्ट नाही. इतर देशांच्या तुलनेत आपल्या व्यवस्था कमी आहेत. लोकसंख्याही आपली खूप आहे. पण, असे असतानाही आपण चांगले काम केले आहे. अनेक लोक अनाथ झाले. मुलांचा हट्ट पूर्ण करणारे निघून गेले. ही पिडा आपल्यासोबत राहणार आहे.

3. एक वेळ येते जेव्हा देश नव्या संकल्पासोबत पुढे जातो. आता ती वेळ आली आहे. आपल्याला असा भारत निर्माण करायचाय जेथे गाव आणि शहरातील सुविधेचा स्तर वेगळा असू नये. असा देश निर्माण करायचा आहे जेथे सर्व सुविधा असतील. आपण कोणत्याही गोष्टीत कमी नाही असा देश घडवायचाय. या संकल्पासोबत कष्ट आणि पराक्रम आवश्यक आहे. ते आपण सिद्ध करुन दाखवू. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी आपण आतापासूनच सुरुवात करत आहोत. आपल्याकडे गमावण्यासारखं काही नाही. आपल्याला नागरिक म्हणून बदलावं लागेल. परस्थितीनुसार बदलावं लागले. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा संकल्प आहे. सर्वांना आवाहन आहे आता यात 'सबका प्रयास' याचाही समावेश करावा.

4. फाळणीच्या भीषण शोकांतिकेची आठवण म्हणून हा दिवस पाळला जाणार आहे. द्वेष आणि हिंसेमुळे आजच्या दिवशी आमच्या लाखो बंधू भगिनी व मातांना जबरदस्तीने विस्थापित व्हावे लागले. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळण्यात येईल

5. आयुष्यमान भारत, उज्वला गॅस अशा योजनांची गती वाढली आहे. आपल्याला पूर्णतेकडे जायचं आहे. सर्व गावात रस्ते असावेत, सर्वांचे बँख खाते असावे, सर्वांकडे आयुष्यमान भारत कार्ड असावे, आवास योजना, सर्वांच्या घरी गॅस जोडणी असावी हे आपले लक्ष्य आहे. आपल्याला काही वर्षांत आपले संकल्प पूर्ण करायचे आहेत. देशातील प्रत्येक गरीबापर्यंत पौषण पोहोचवणे सरकारची प्राथमिकता आहे. कुपोषण, पौष्टीकतेची कमी यामुळे समस्या निर्माण होतात. त्यासाठी तांदळाच्या पुरवठ्यात वाढ करण्यात येईल. पौष्टीक तांदूळ देण्यात येईल. २०२४ पर्यंत मिळणारे सर्व तांदूळ पौषणयुक्त असेल, असं मोदी म्हणाले.

6. देशात मेडिकल जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा गावापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आतापर्यंत ७५ हजारांपेक्षा अधिक हेल्थ सेंटर बनवण्यात आले आहेत. कमी दरांमध्ये औषध पुरवले जात आहेत. भारताच्या सामर्थ्यांचा पूर्ण वापर वेळेची गरज आहे. त्यामुळे जे क्षेत्र मागे आहे त्याला पुढे घेऊन जावं लागले. वंचित नागरिकांसाठी आरक्षण दिलं जात आहे. ओबीसींसाठी आरक्षण करण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. आपल्याला कोणालाही मागे सोडायचं नाही. देशाचा प्रत्येक भूभागाचा विकास करायचा आहे, असं मोदी म्हणाले.

7. लवकरच ईशान्य भारतातील सर्व राजधान्यांना रेल्वेने जोडले जाणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. स्थायी शांततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. ईशान्य भारतात खूप क्षमता आहे. त्याला मुख्य प्रभावात जोडलं जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विकास दिसून येत आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. लडाखमध्ये सिंद्धू सेंट्रर युनिव्हर्सिटी सर्वांचे लक्ष वेधते आहे, असंही मोदी म्हणाले.

8. भारत सहकारवादावर भर देत आहे. आपल्या परंपरेला ते अनुकूल आहे. 8 कोटींपेक्षा अधिल सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांसाठी ई-

कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या वस्तू देशभरात पोहोचवण्यासाठी मदत होईल.

9. भारत एनर्जीवर दुसऱ्यावर अवलंबून आहे. आत्मनिर्भर भारतासाठी हा अडथळा आहे. त्यामुळे एनर्जीमध्ये आत्मनिर्भर होणे ही काळाजी गरज आहे. त्यामुळे इतर इंधन प्रकाराचा वापर करण्याचा संकल्प करुया. इकेल्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आपण पाऊल टाकलं आहे. 2030 पर्यंत सर्व रेल्वे इलेक्ट्रिक असतील. जी-20 देशांमध्ये भारत क्लायमेंट गोल पूर्ण करण्यात पुढे जात आहे. ग्नीन हायड्रोज मिशनची घोषणा करत असल्याचं मोदी म्हणाले. ग्रीन ग्रोथ ते ग्रीन जॉब तरुणांना मिळतील, असंही ते म्हणाले.

10. भारतीय रेल्वे नव्या रुपात समोर येत आहे. गतीने आधुनिक रुप घेत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 आठवड्यात 75 वंदे भारत रेल्वे देशाच्या प्रत्येक भागाला जोडतील, असं मोदी म्हणाले आहेत. देशात हवाई सेवा वाढत आहेत. अनेत भागात विमानसेवा पोहोचत आहे. कनेक्टिविटी वाढत आहे. आपण पाहतोय की आपले गाव बदलत आहेत. गेल्या काही वर्षात वीज, रस्ते गावात पोहोचले आहेत. सध्या ऑपटिकल फायबर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इंटरनेट गावात पोहोचले आहे. डिजिटल उद्योजक आता गावातही तयार होत आहेत.

11. मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा देशातील तरुणांवर, शेतकरी सर्वांवर विश्वास आहे. प्रत्येक लक्ष्य ते संपादन करु शकतात. आजपासून 25 वर्षांनी 2047 मध्ये जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा जे कोणी पंतप्रधान असतील ते आपल्या ते भाषणात ज्याचा उल्लेख करतील तो संकल्प आज देश करत आहे. हा माझा विश्वास आहे. मातृभाषेतून सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारचं धोरण आहे. गरिबांना साक्षर करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण अत्यवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT