Gujarat Navsari esakal
देश

Car-Bus Accident : चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; कार-बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

सकाळी झालेल्या या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

सकाळी झालेल्या या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता.

गुजरातच्या नवसारी (Gujarat Navsari) इथं आज (शनिवार) सकाळी भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात कार आणि बसची (Car-Bus Accident) जोरदार धडक झाली. यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वेसमा गावाजवळ हा प्रकार घडला. बस चालकाला (Bus Driver) चालत्या वाहनात हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळं त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कारला धडक दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. यापैकी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन्ही वाहनांच्या काचा फोडाव्या लागल्याचं पोलिसांनी सांगितलं, त्यामुळं जखमींपर्यंत मदत पोहोचण्यास थोडा विलंब झाला आहे.

अपघातानंतर महामार्गावर जाम

सकाळी झालेल्या या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात नेऊन आणि मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनं क्रेनच्या साहाय्यानं रस्त्याच्या कडेला लावली. मात्र, यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT