Nalanda University
Nalanda University Sakal
देश

Nalanda University: इसवी सन 427 मध्ये स्थापना..जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र असलेले 'नालंदा' 700 वर्षांनी नामशेष कसे झाले?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- शतकांचा वारसा असलेल्या नालंदा विद्यापीठाला आपल्या जुन्या स्वरुपात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत. नालंदा विद्यापीठाचा इतिहास फार जुना आहे. असं सांगितलं जातं की, जेव्हा जगामध्ये विद्यापीठ स्थापन करण्यास सुरुवात झाली, त्याआधीच अनेक शतके आधी नालंदा विद्यापीठाने नाव जगभरात झालं होतं. नालंदा हे जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं.

सर्वात जुने विद्यापीठ म्हणून याची ओळख आहे. इसवीसन ४२७ मध्ये याची स्थापना झाली होती. विद्यापीठामध्येच विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करण्यात आली होती, त्यामुळे अशा प्रकारचं हे जगातील पहिलंच विद्यापीठ होतं. जगभरातून अनेक विद्यार्थी याठिकाणी शिकण्यासाठी यायचे असं सांगितलं जातं. मध्य आणि पूर्वमधील जवळपास १० हजार विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत होते.

याच पार्श्वभूमीवर नालंदा विद्यापीठाचा इतिहास काय आहे? याठिकाणी कोण-कोण शिक्षक घेतलं आहे? कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी विद्यापीठ ओळखलं जात होतं? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

जगासमोर कधी आले?

आधुनिक जगाला १९ व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठाची ओळख झाली. अनेक शतकं हे विद्यापीठ जमिनीखाली दबलं गेलं होतं. सुरुवातीच्या काळात स्थानिक लोकांना याठिकाणी जुन्या वस्तू आढळून आल्या होत्या. १८१२ साली बिहारच्या स्थानिक लोकांना याठिकाणी बौद्धाच्या मूर्ती सापडल्या. त्यामुळे विदेशी इतिहासकारांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली. फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन यांनी याठिकाणी उत्खनन सुरु केलं. मात्र, नालंदा विद्यापीठाचा शोध १८६१ मध्ये लागला. याचे श्रेय अलेक्झांडर कनिंगहॅम यांना जाते.

गुप्त सम्राटांच्या काळात नालंदाला विद्यापीठाचे स्वरुप आले. गुप्त सम्राट हिंदू होते, मात्र त्यांना बौद्ध तत्वज्ञानाबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे त्यांनी विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जायचे. प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, बौद्ध तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र यांचा अभ्यास केला जायचा. आर्यभट्ट हे विद्यापीठाचे सहाव्या शतकामध्ये प्रमुख होते असं सांगितलं जातं.

नालंदा विद्यापीठामध्ये शिकून अनेक विद्वान चीन, कोरिया, जपान, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्ये गेले. त्यांनी त्याठिकाणी आपल्या ज्ञानाचा प्रसार केला. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी या विद्वानांची महत्त्वाची भूमिका होती. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे.

नालंदा विद्यापीठात कोण-कोण शिकलंय?

नालंदा विद्यापीठामध्ये अनेक महान लोकांनी शिकवण्याचं काम केलं आहे. याठिकाणी नागार्जुन, बुद्धपालिता, शांतरक्षिता आणि आर्यदेव इत्यादी शिक्षकांनी अध्यापनाचं काम केलं आहे. याठिकाणी शिक्षण घेतलेल्यांमध्ये विदेशी विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. चीनचे प्रसिद्ध पर्यटक आणि विद्वान ह्वेन सांग, फाह्यान आणि इत्सिंग याठिकाणी कधी शिक्षणासाठी आले होते. ह्वेन सांग नालंदाचे आचार्य शीलभद्र यांचे शिष्य होते. माहितीनुसार, ह्वेन सांग ६ वर्ष या विद्यापीठात शिकत होते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते.

नालंदा विद्यापीठाचा आकार

माहितीनुसार, नालंदा हे परिपूर्ण असे विद्यापीठ होते. इथे तब्बल ९ मजल्यांचे ग्रंथालय होते. यात जवळपास ९० लाख पुस्तके होते असं सांगितलं जातं. याठिकाणी ३०० खोल्या होत्या आणि ७ मोठे हॉल होते. विद्यापीठाचा कॅम्पस अनेक एकरमध्ये पसरला होता. या ग्रंथालयाला आग लावण्यात आल्यानंतर ते ३ महिन्यांपर्यंत जळत होते, असं सांगितलं जातं. त्यावरुन ग्रंथालयात किती पुस्तके होते याचा अंदाज येईल. ग्रंथालयात भारतीय इतिहास आणि प्रत्येक विषयावरील पुस्तके ठेवण्यात आले होते.

नालंदा विद्यापीठामध्ये विविध क्षेत्रामधील ज्ञान दिल जात होतं. जे कुठेच शिकवलं जात नव्हतं, ते नालंदामध्ये शिकवलं जात होतं. म्हणूनच परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी याठिकाणी नाव नोंदणी करून निवासासाठी यायचे. जवळपास ७०० वर्ष नालंदा विद्यापीठाने ज्ञान देण्याचे काम केल्याचं सांगितलं जातं. यावेळी अनेकदा याला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला.

उध्वस्त कोणी केलं?

नालंदा विद्यापीठावर अनेकदा हल्ले झाले, पण ७०० वर्षांपर्यंत हे विद्यापीठ टिकून राहिलं. पण, १२ व्या शतकामध्ये बख्तियार खिलजी याने हल्ला करून विद्यापीठाला आग लावल्याचं सांगितलं जातं. यावेळी विद्यापीठाचं भयंकर नुकसान झालं. खिलजीचा विद्यापीठ उद्धस्त करण्यामागचा हेतू काय होता याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते बौद्ध धर्मांच्या द्वेषापायी याला उध्वस्त करण्यात आले, तर काहींच्या मते संपत्तीच्या अफवांमुळे यावर आक्रमण करण्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EWS, SEBC व OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Justin Bieber: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्यासाठी आलेल्या जस्टिन बिबरने मुंबईत उतरताच सगळ्यात आधी केली 'ही' गोष्ट

Crime: शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात तलवारीने सपासप वार; शहीद सुखदेव यांचे आहेत नातेवाईक

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल आतंकवादी नाहीत, उच्च न्यायालयात काय घडलं? सीबीआयला देखील नोटीस

NEET PG 2024 Exam: NEET PG 2024 परीक्षेची नवीन तारीख जाहीर, 'या' दिवशी दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार

SCROLL FOR NEXT