9 Years Of Modi Government pm nrendra modi big schemes and 9 big decisions check details  
देश

9 Years Of Modi Government : नऊ वर्षात घेतलेल्या 'या' निर्णयांमुळे आजही मोदींना हरवणं जवळपास अशक्य; वाचा सविस्तर

रोहित कणसे

9 Years Of Modi Government : पंतप्रधान मोदी सत्तेत आल्याच्या घटनेला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. २६ मे २०१४ साली पीएम नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सरकार स्थापन केलं. २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. तर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत देखील विरोधकांना पराभव स्वीकारावा लागला. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला होता.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. या नऊ वर्षामध्ये अनेक सरकारी योजना जाहीर करण्यात आल्या तसेच त्यांची अंमलबजावणी देखील करण्यात आली. मोदींच्या कार्यकाळातच भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला.

मोदींच्या कार्यकाळात स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत देशभरातील गाव आणि शहरांमध्ये १२ कोटी शौचालये बांधण्यात आली. जनधन योजनेअंतर्गत ४८.९३ कोटी लोकांचे बँक खाते उघडण्यात आले. मुद्रा योजनेत कुठल्याही गँरंटीशिवया कर्ज देण्यात आले. या योजनेचा लाभ घेत आतापर्यंत ४०.८२ कोटी लोकांना २३.२ लाख कोटींचं कर्ज देण्यात आलं आहे.

पीएम आवास योजनेत पात्र लाभार्थ्यांसाठी ३.४५ कोटी घरे बांधण्यात आले. उज्वला योजनेअंतर्गत ९.५९ कोटी घरांमध्ये एलपीजी कनेक्शन पोहचवण्यात आले. केंद्र सरकारच्या जन आरोग्य योजनेअंतर्गत ४.४४ कोटी लोकांवर उपचार झाले. तर किसान सन्मान योजना निधी योजनेत देशभरात १२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मदत म्हणून दिले जात आहेत.

सरकारने हर घर जल योजनेअंतर्गत ११.६६ कोटी कुटुंबांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. तसेच करोना काळात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणात २२०.६७ कोटी वॅक्सीन डोस दिले आहेत.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजनेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१६ मध्ये पीएम मोदींनी नोटाबंदीची घोषणा करून सर्वांना चकित केलं होते.

२०१७ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी GST लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये, मोदी सरकारने पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली. ज्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळतात.

२०१९ मध्ये मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला होता. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर २०२० मध्ये सरकारने राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केली. २०२१ मध्ये कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने स्वदेशी लसीद्वारे लसीकरण मोहीम सुरू केली. डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०२२ मध्ये 5G सेवा सुरू केली.

२०१४ ते २०२३ या काळात काय बदललं?

२०१४ मध्ये देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ होती, ती आता ६९२ झाली आहे. २०२३ मध्ये एम्सची संख्या २४ पर्यंत वाढली आहे, जी २०१४ मध्ये फक्त ६ होती. २०१४ पर्यंत देशात ७२३ विद्यापीठे होती, जी २०२३ मध्ये वाढून १४७२ झाली आहेत. तसेच देशात १६ IIT संस्था होत्या, ज्यांची संख्या २०२३ मध्ये २३ झाली आहे. देशात १३ IIM होते, ज्यांची संख्या आता २० झाली आहे.

भारताची वीज निर्मिती क्षमता २०१४ मध्ये २.३४ लाख मेगावॅट होती, जी २०२३ मध्ये वाढून ४.१७ लाख मेगावॅट झाली आहे. २०१४ पर्यंत देशात १३ कोटी गॅस कनेक्शन होते, जे वाढून ३१ कोटी झाले. देशातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी ९१,२८७ किमी पर्यंत होती, जी २०२३ मध्ये १.४४लाखांहून अधिक झाली आहे.

देशातील विमानतळांची संख्या ७४ वरून वाढून १४८ झाली. २०१४ पर्यंत देशातील फक्त २१,६१४ किमी रेल्वे मार्ग विद्युत लाईनने जोडलेले होते. २०२३ मध्ये ते ५८,८१२ किमी पर्यंत वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT