Sharia Law sakal
देश

Sharia Law : बंगालमध्ये शरिया आणण्याचा डाव;जोडप्याला मारहाणीनंतर भाजपची टीका,घटनेचे राज्‍यभर पडसाद

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने एका जोडप्याला बेदम मारहाण केल्याच्या व्हिडिओ रविवारी (ता.३०) व्हायरल झाल्यानंतर भाजपसह विरोधी पक्षांनी ‘तृणमूल’वर टीका केली आहे. ‘‘राज्यात शरिया लागू करण्याच्या दिशेने ‘तृणमूल’चा कारभार सुरू अाहे,’’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी सोमवारी केला.

उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात कथित अवैध संबंधांवरून एका दांपत्याला मारहाणीचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही आनंद बोस यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून अहवाल मागविला आहे. दिनाजपूरमधील मारहाण आणि कूचबिहारमध्ये महिलेला निर्वस्त्र करून अत्याचार केल्याची घटना घडली होती. याच्या निषेधार्थ भाजपच्या महिला आमदारांनी विधानसभा परिसरात आज आंदोलन केले. या व्हिडिओत एक व्यक्ती महिलेला काठीने मारत असल्याचे दिसत आहे.

भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखाराचे नाव तजमूल ऊर्फ ‘जेसीबी’ असे असून तो सत्ताधारी ‘तृणमूल’शी संबंधित आहे. स्थानिक वादांवर ‘त्वरित न्याय’ देण्यासाठी तो ओळखला जातो. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ‘जेसीबी’ला अटक केली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने या घटनेची दखल घेतली असून आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडले जाणार नाही, असे तृणमूलने जाहीर केले.

‘संदेशखाली असो, उत्तर दिनाजपूर असो किंवा इतर ठिकाण दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित बनले आहे. तेथून एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. केवळ धर्मशासनात अस्तित्वात असलेल्या क्रूरतेची आठवण करून देतो. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आमदार या घटनेचे समर्थन करत असल्याने याचे गांभीर्य जास्त आहे.

- जे.पी.नड्डा, अध्यक्ष, भाजप

आणखी एक झुंडबळी

पश्चिम बंगालमधील झारग्राम जिल्ह्यातील एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात जमावाने त्याला मारहाण केली होती, असे पोलिसांनी सांगितले. कोलकता आणि सॉल्ट लेकमध्ये २८ व २९ जून रोजी अशाच घटना घडल्या होत्या. झारग्राम शहराजवळील जांबोनी परिसरात २२ जून रोजी सौरभ साऊ हे जखमी अवस्थेत आढळून आले होते, काल त्यांचा मृत्यू झाला. सॉल्ट लेकमध्ये शनिवारी (ता.२९) जमावाच्या मारहाणीत प्रसेन मोंडल यांचा मृत्यू झाला तर शुक्रवारी (ता.२८) कोलकताच्या बोबजार येथे सरकारी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात इर्शाद आलम याला मारहाण करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT