Satellite photo sakal
देश

Satellite Photo : लवकरच मिळणार घरामागील अंगणाचे सॅटेलाईट छायाचित्र;बंगळूर येथील ‘पिक्सेल’ कंपनीकडून घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लवकरच तुमच्या घरामागील अंगणाचे थेट सॅटेलाईटने टिपलेले छायाचित्र तुम्हाला उपलब्ध होणार आहे. बंगळूर येथील पिक्सेल ही अवकाश क्षेत्राशी निगडित स्टार्टअप कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे. या कंपनीच्या उपग्रहाने टिपलेल्या पृथ्वीच्या छायाचित्रांतून तुम्हाला अगदी तुमच्या घरामागील अंगणाचे छायाचित्र देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पिक्सेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अवैस अहमद यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, कंपनीच्या उपग्रहाद्वारे जी पृथ्वीची छायाचित्रे टिपली आहेत त्या आधारे माफक शुल्क घेऊन सर्व सामान्यांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षाअखेर ही सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

‘‘हे सॉफ्टवेअर गुगल अर्थ इतकेच सोपे असेल मात्र यामाध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या छायाचित्रांची गुणवत्ता ही अत्यंत उच्च दर्जाची असेल,’’ असा दावाही अहमद यांनी केला आहे.

असा होणार उपयोग

‘पिक्सेल’च्या आॅरोरा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांच्या उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून तुम्हाला आवश्‍यक असणारी छायाचित्रे तुम्ही मिळवू शकता किंवा पृथ्वीच्या खालच्या कक्षेतून फिरणाऱ्या पिक्सेलच्या उपग्रहाला तुम्ही तुम्हाला हवी असलेली छायाचित्रे मागू शकता. तुमच्या मागणीनुसार छायाचित्रे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अहमद यांनी सांगितले. ‘पिक्सेल’चे शकुंतला आणि आनंद हे दोन उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरत असून पृथ्वीची छायाचित्रे घेत आहेत.

आणखी सहा उपग्रह प्रक्षेपित करणार

‘पिक्सेल’ने दिलेल्या माहिती नुसार सध्या पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरणारे दोन उपग्रह हे स्पेस एक्स आणि इस्रोच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले असून या वर्षाअखेर आणखी सहा उपग्रह तर पुढील वर्षी १८ उपग्रह प्रक्षेपित करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. यामध्ये कमी तरंगलांबी असलेले इन्‍फ्रारेड कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT