UP Hathras Stampede
UP Hathras Stampede  sakal
देश

UP Hathras Stampede :सत्संगानंतर चेंगराचेंगरी;उत्तर प्रदेशात ११६ जण मृत्युमुखी; १५० जखमी

प्रशांत पाटील

हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात फुलराई मुघलगडी (सिकंदराराऊ ठाणा) येथे मंगळवारी धार्मिक सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ भाविकांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. सर्व जखमींना एटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा १२२ पर्यंत पोहोचला आहे.

एटा आणि हाथरस या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुलराई मुघलगडी येथे साकार हरी बाबांचा शेकडो एकर परिसरामध्ये सत्संग आयोजित करण्यात आला होता असे अलिगड रेंजचे महानिरीक्षक शलभ माथूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. योगी सरकारने या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारी तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाबांना सोडले, भक्त अडकले

फुलराई मुघलगडी येथे साकार हरी बाबांच्या एक दिवसीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. पावणेदोनच्या सुमारास हा सत्संग संपल्यानंतर शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडायला सुरूवात केली. यावेळी बाबांच्या सेवादारांनी भाविकांना रोखून धरले होते. आधी साकार हरी बाबा यांच्या ताफ्याला सोडण्यात आले. ऊन लागत असल्याने अनेक भाविकांनी येथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली. या रेटारेटीमध्ये अनेकजण बेशुद्ध पडले

हाथरसमधील दुर्घटनेचे वृत्त ऐकून मला दुःख झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. जखमींना लवकर आराम पडो अशी प्रार्थना करते.

- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

या दुर्घटनेबाबत मी आताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पीडितांना सर्वोतपरी मदत करण्यात येईल. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

यूपी सरकारने हाथरसमधील पीडितांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही मदत आणि बचाव कार्यासाठी पुढाकार घ्यावा. पीडित कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : मुंबईला पावसाने झोडपले; 6 तासांत पडला 300 मिमी पेक्षा अधिक पाऊस

Mumbai Worli Hit and Run: शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा, दहावी पास...वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे?

Euro 2024 : इंग्लंडची पेनल्टींवर बाजी! स्वित्झर्लंडविरुद्ध विजयात गोलरक्षक पिकफोर्ड अभेद्य

Rain Update: महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार... मुंबई-कोकणासाठी धोक्याची घंटा! रेल्वेसेवा विस्कळीत, महामार्ग बंद

Zika Virus : पुण्यात झिकाचे आणखी दोन नवीन रुग्ण; रुग्णांची संख्या अकरावर

SCROLL FOR NEXT