Aadhaar card  Sakal
देश

Aadhaar Card : पायाचे ठसे वापरून बनवलं आधार कार्ड...; टोळीचा कारनामा वाचून सगळेच चक्रावले!

सकाळ डिजिटल टीम

आधार कार्ड सध्या आपली गरज बनली आहे, प्रत्येक सरकारी कामात आपल्याला त्याची गरज पडते. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रविवारी शहरातील सात जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली. दरम्यान त्यांच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.

बनावट आधार कार्ड बनवणारी टोळी चालवणाऱ्या तीन आणि चार ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. हे टोळी बनावट आधार कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला 15 ते 20 हजार रुपये आकारत असल्याचा दावा केला जात आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीवर UIDAI प्रणालीशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.

गंभीर बाब म्हणजे, ही टोळी आधार कार्ड बनवण्यासाठी ही टोळी पायाचे प्रिंट वापरून बनावट आधार क्रमांक तयार करत होती. बनावट टोळीने ग्राहकांकडून बायोमेट्रिक्स गोळा केले आणि रेटिना स्कॅनमध्ये देखील फेरफार केली. याद्वारे त्यांनी नवीन आधार क्रमांक तयार करण्यासाठी नवीन डेटा UIDAI डेटाबेसमध्ये अपलोड केला.

या टोळीने दिलेले आधार क्रमांक बनावट नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पण नाव आणि पत्ता यासारखे इतर तपशील देखील आहेत. या टोळीच्या कार्यपद्धतीवरून स्पष्ट झाले आहे की या लोकांचा UIDAI च्या डेटाबेसचा एक्सेस होता. हे त्यामध्ये छेडछाड करायचे.

या प्रकारनंतर लोकांना त्यांचे आधार कार्ड डिटेल्स किंवा त्याच्याशी जोडलेले फोन नंबर कोणी वापरणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

रॅकेट कसे चालायचं?

बनावट आधार कार्ड रॅकेट कसे चालते? यासंदर्भातील चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. हे एका उदाहरण पाहायचे झाल्यास. सतीश नावाची एक व्यक्ती आहे, ज्याचा CIBIL स्कोअर खराब आहे. CIBIL स्कोअर ही तीन अंकी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोअर दाखवते करते. CIBIL स्कोअर चांगला असेल तरच कर्जाचा अर्ज मंजूर होतो.

सतीशला कर्जाची गरज आहे, पण त्याचा खराब CIBIL स्कोअर असल्याने त्याला अडचण येत आहे. अशा परिस्थितीत त्याला नवीन आधार क्रमांक बनवणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. आणि तो त्यांच्याशी संपर्क साधतो. रॅकेट चालवणारे सतीशचे नाव बदलून सुरेश ठेवतात. याशिवाय त्याचा पत्ता बदलता. ही टोळी बायोमेट्रिक्स डेटामध्ये देखील फेरफार करते. हे रॅकेट सुरेशच्या नावाने सतीशचे नवीन आधार कार्ड बनवते.

या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सांगतात हे सर्व कसे घडले याबद्दल लगेच काही लक्षात आले नाही. कारण ग्राहकांना दिलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे दिसून आले. यानंतर यूआयडीएआयच्या वेबसाइटवर हे आधार क्रमांक टाकून तपासणी करण्यात आली. ते आधार वेबसाइटशी जुळतात.

डीसीपींनी काय सांगितलं..

मिडीया रिपोर्टनुसार सेंट्रल नोएडा डीसीपी रामबदन सिंह यांनी सांगितले की, टोळीने नंतर या आधार कार्डांचा वापर पॅन कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे बनवण्यासाठी केला.

संशयितांकडून चार बनावट आणि पाच मूळ आधार कार्ड, 15 पॅन कार्ड, चार आधार नोंदणी स्लिप, आधार फिंगर प्रिंट स्कॅनर, आयरिस स्कॅनर आणि एक वेबकॅम जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या टोळीच्या सदस्यांना दिल्लीतील एका बँकेत काम करणाऱ्या सहकाऱ्याकडून मदत मिळाली होती. त्यांनी आधार प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी आणि खोटी नावनोंदणी करण्यासाठी अधिकृत आधार ऑपरेटरच्या अंगठ्याच्या ठशाचा सिलिकॉन मोल्ड वापरला गेला.

नोएडा येथील रहिवासी दीपक कुमार, शिवेंद्र सिंग आणि दिल्लीचा रहिवासी मोहित कुमार अशी या तीन सूत्रधारांची ओळख पटली आहे. तो सेक्टर 63 मध्ये अवैध जनसेवा केंद्र चालवत असे. अन्य चार अटक आरोपी मोहम्मद चांद हा नोएडाचा रहिवासी, मुझफ्फरनगरचा रहिवासी मनीष कुमार आणि गाझियाबादचे रहिवासी विशाल सिंग आणि अतुल गुप्ता यांनी बँक कर्ज मिळविण्यासाठी टोळीने बनवलेल्या बनावट आधार कार्डचा वापर केला होता.

दोन वर्षांपासून सक्रिय होती टोळी

बनावट आधार कार्ड बनवणारी ही टोळी दोन वर्षांपासून सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी अशा प्रकारे किती कार्डे बनवली हे शोधण्याचा पोलीस अजूनही प्रयत्न करत आहेत. सात संशयितांविरुद्ध सेक्टर 63 पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सेक्टर 63 चे एसएचओ अमित कुमार मान यांनी सांगितले की, त्यांना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की ते नंबर कसे तयार झाले हे समजून घेण्यासाठी ते UIDAI अधिकाऱ्यांशी संपर्क साधतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT