Aadhar Latest Update : यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डबाबत एक मोठी घोषणा केली आहे. UIDAI ने आता लोकल दुकानातून तयार केलेले PVC आधार कार्ड अवैध घोषित केले आहेत. आता केवळ UIDAI द्वारे जारी केलेले आधार PVC कार्ड वैध असल्याचे सांगण्यात आले असून कोणतीही व्यक्ती फक्त 50 रुपये शुल्क भरून हे आधार कार्ड मिळवू शकते. (aadhaar pvc card from open market not valid know why and how to order valid aadhaar pvc card)
UIDAI ने ट्विट करून ही माहिती दिली आहे, यामध्ये कुठल्याही जवळच्या दुकानातून बनवलेले PVC आधार कार्ड अवैध असल्याची माहिती दिली आहे. आजच्या युगात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र बनले आहे. हे जवळजवळ सर्व आवश्यक कामांसाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या दुकानातून बनवलेले पीव्हीसी आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर ते बदला आणि नवीन कार्डसाठी UIDAI मध्ये अर्ज करा.
ते अवैध का आहे?
काही दिवसांपूर्वी UIDAI ने स्वतः आधार PVC कार्ड जारी केले होते. जे एटीएम किंवा डेबिट कार्ड आकाराचे असल्याने ते खिशात किंवा पर्समध्ये घेऊन जाणे सोपे होते. यात अनेक सुरक्षा फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत जसे की PVC आधारमध्ये QR कोड स्कॅन करून, तुमची ओळख त्वरित व्हेरिफाय केली जाऊ शकते. पण नागरिकांनी UIDAI कडून PVC आधार कार्ड मिळवण्याऐवजी लोकांनी जवळच्या दुकानातून ते बनवून घेतले आहेत. PVC आधार कार्डमध्ये अनेक सुरक्षा उपायांसह फोटोग्राफ आणि डेमोग्राफीक तपशीलासह डिजिटल स्वाक्षरी केलेला सुरक्षित QR कोड दिलेला असतो. आधार पीव्हीसी कार्ड रहिवाशाच्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पुरवले जाते.
हे आधार कार्ड सुरक्षित नाही
अशा आधार कार्डांमध्ये सुरक्षा फीचर्स नसतात आणि ती असुरक्षित असतात. त्यामुळेच UIDAI ने आता तुम्ही इतर ठिकाणहून बनवून घेतलेले PVC आधार कार्ड न वापरण्याचा सल्ला दिला आहे. UIDAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही बाजारातील PVC आधारची कॉपी वापरण्यास पूर्णपणे समर्थन देत नाही कारण त्यात कोणतीही सुरक्षा वैशिष्ट्ये नाहीत. तुम्ही 50/- (GST आणि स्पीड पोस्ट शुल्कासह) भरून आधार PVC कार्ड ऑर्डर करू शकता." UIDAI ने सांगितले की uidai.gov.in वरून डाउनलोड केलेले आधार किंवा आधार लेटर किंवाM-आधार प्रोफाइल (M-Aadhaar) किंवा UIDAI द्वारे जारी केलेले आधार PVC कार्ड हे आधार कार्ड संबंधीत कामासाठी वापरले जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.