नवी दिल्ली : दिल्लीच्या मालवीयनगरातील पार्कमध्ये आरएसएस समर्थक तिरंगा ध्वज फडकवू देत नाहीत. त्याचा राष्ट्रवाद फसवा आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या आमदारांनी विधासभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजी केली. तर भाजपच्या सदस्यांनी ‘टुकडे-टुकडे गॅंग’ असे प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात वातावरण तापले होते.‘आप’चे आमदार सोमनाथ भारती यांनी मालवीयनगरातील विषय सभागृहात उपस्थित केला. विरोधक आणि सत्तापक्षातील वाद विकोपाला गेल्याने विधानसभाअध्यक्षांनी मार्शलला बोलावले.
५२ वर्षांपासून आरएसएसने तिरंगा नाही तर त्यांचाच झेंडा फडकावला आहे, असा आरोप भारती यांनी केला. भाजपच्या आमदारांनी याला आक्षेप नोंदवला. विधानसभाअध्यक्षांनी भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र महाजन यांना मार्शल बोलावून सदनाच्या बाहेर काढले. महाजन यांना दिवसभरासाठी निलंबित केले आहे.
गंभीर बाब - सिसोदिया
आरएसएस व भाजपचे नेते, नगरसेवक तिरंगा लावण्यापासून रोखत असेल तर याहून मोठा देशद्रोह कुठला नाही. ही गंभीर बाब आहे. प्राणाची आहुती देवू परंतु तिरंगा तिथेच फडकवू, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले. दरम्यान, राघव चढ्ढा यांनी दिल्ली विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी अध्यक्ष रामनिवास गोयल आणि विरोधीपक्ष नेते रामवीर यांनी सिंह बिधूडी राघव चढ्ढा यांना शुभेच्छा दिल्या.
दिल्लीची अर्थव्यवस्था मजबूत: बैजल
दिल्ली सरकारच्या उत्तम कामांमुळे कल्याणकारी उपक्रम आणि विकास प्रक्रियेला चालना मिळाली. कोविडमुळे आर्थिक वाढ खुंटली असली तरीही अर्थव्यवस्थेतील लवचिकतेने दुष्परिणामांची भरपाई केली, असे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी अभिभाषणात सांगितले. दरडोई उत्पन्न २०२१-२२ मध्ये ४,०१,९८२ कोटी रुपये आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट आहे. सरकारने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.