Chandigarh Municipal Election 2021 esakal
देश

महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या 'आप'ची जबरदस्त आघाडी

सकाळ डिजिटल टीम

भाजप आणि काँग्रेसच्या अनेक प्रमुख चेहऱ्यांचा खेळ 'आप'चे उमेदवार बिघडू शकतात.

Chandigarh Municipal Election 2021 : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं (AAP) चंदिगडमधील महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसवर मोठी आघाडी घेतलीय. 21 जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर 35 पैकी नऊ महापालिका वॉर्डात 'आप'नं विजय मिळवलाय, तर भाजपनं सहा आणि कॉंग्रेसनं पाच जागा जिंकल्या आहेत. शिवाय, निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress Party) उमेदवार मोनिका या प्रभाग क्रमांक 1 मधून आघाडीवर आहेत. मोनिका यांना आतापर्यंत 1632 मते मिळाली आहेत. भाजपच्या मंजित कौर यांना 720 आणि आपच्या जसविंदर यांना 981 मते मिळाली, तर प्रभाग क्रमांक 29 मधून आपचे (Aam Aadmi Party) मुन्नावर आघाडीवर असल्याचं कळतंय.

प्रभाग 13 काँग्रेसच्या खात्यात

चंदिगड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं खातं उघडलंय. प्रभाग 13 मधून काँग्रेसचे सचिन गालव (Sachin Galav) विजयी झाले आहेत. काँग्रेसचे सचिन गालव यांनी आम आदमी पक्षाच्या चंद्रमुखी शर्मा यांचा पराभव केलाय. गालव 285 मतांनी विजयी झाले आहेत.

महापालिकेत प्रथमच तिरंगी लढत

महानगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत असायची. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाच्या प्रवेशानं निवडणूक तिरंगी झालीय. यंदा महानगरपालिकेत आमचाच महापौर असेल, असा दावा आप नेत्यांनी केलाय. परंतु, आम आदमी पक्षाला महापौरपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसच्या अनेक प्रमुख चेहऱ्यांचा खेळ 'आप'चे उमेदवार बिघडू शकतात. तर, अनेक जागांवर भाजप आणि आपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत पहायला मिळत आहे. यावेळी जनता आपल्यासोबत असून महापौर आमचाच असेल, असा दावाही काँग्रेसनं केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT