aap invites hardik patel to party amid buzz over rift in congress  Sakal
देश

"काँग्रेसमध्ये आवडत नसेल, तर.."; हार्दिक पटेल यांना 'आप'कडून ऑफर

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल हे पक्षातील अंतर्गत भांडणातून राजीनामा देऊ शकतात, अशा चर्चेदरम्यान, आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी आज त्यांना 'आप'मध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. दोन्ही समविचारी पक्ष असल्याचे सांगत पटेल यांच्यासारख्या समर्पित लोकांना कॉंग्रेसमध्ये स्थान नाही असे देखील इटालिया म्हणाले.

"जर हार्दिक पटेलला काँग्रेसमध्ये आवडत नसेल, तर त्यांनी काँग्रेसकडे तक्रार करण्यापेक्षा आप सारख्या समविचारी पक्षात जावे, आपला वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी येथे योगदान द्यावे... काँग्रेससारख्या पक्षात त्याच्यासारख्या समर्पित लोकांना स्थान नसते. " असे इटालियाने एएनआयला सांगितले. हार्दीक पटेल यांनी मात्र काँग्रेस सोडणार असल्याच्या अफवांचे खंडन केले आहे.

"मी आजपर्यंत काँग्रेसला माझे 100 टक्के दिले आहेत, आणि येत्या दिवसांतही तेच देईन. गुजरातमध्ये आम्ही अधिक चांगला विकास करू. पक्षांतर्गत लहान-मोठे भांडणे होतील, दोषारोपाचे खेळ होतील, पण गुजरातच्या विकासासाठी आम्हाला एकत्र काम करावे लागेल.," असे हार्दिक पटेल म्हणाले.

"खरे बोलणे गुन्हा असेल तर मला दोषी समजा. गुजरातच्या जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे," असेही त्यांनी यावेळी सांगितले. हार्दिक पटेल 2015 मध्ये गुजरातमधील समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी पाटीदार आंदोलनाचे नेते म्हणून उदयास आले आणि नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT