Crime News esakal
देश

Delhi Municipal Election : महापालिका निवडणुकीत ‘कॅश फॉर तिकीट'; आमदारचा पीए गजाआड

आमदार त्रिपाठी यांचे पीए ओम सिंग आणि त्याचे साथीदार शंकर पांडे व राजकुमार रघुवंशी यांना अटक करण्यात आली आहे.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज एक मोठी कारवाई करताना दिल्ली महापालिका (एमसीडी) निवडणुकीत आम आदमी पक्षाचे तिकीट मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली मॉडेल टाऊनचे आमदार अखिलेशपती त्रिपाठी यांचा स्वीय सहाय्यक व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना अटक केली आहे. एमसीडी निवडणुकीत कॅश फॉर तिकीटचा असा खुल्लमखुला खेळ रंगण्याची ही पहिली वेळ मानली जात आहे. या तिघांनी तिकिटासाठी गोपाल खारी या आप कार्यकर्त्याकडूनच लाच घेतल्याचा आरोप आहे. निवडणुकीच्या एन रणधुमाळीत या कारवाईमुळे दिल्ली महापालिका निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.

आमदार त्रिपाठी यांचे पीए ओम सिंग आणि त्याचे साथीदार शंकर पांडे व राजकुमार रघुवंशी यांना अटक करण्यात आली आहे. आपण गेल्या निवडणुकीतही कमलानगर वॉर्ड-६९ मधून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाही, असा आरोप खारी यांनी केला आहे. ते म्हणाले की ‘‘मी २०१४ पासून आम आदमी पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. यावेळी कमला नगरची जागा महिलांसाठी राखीव झाल्याने मी माझी पत्नी शोभा यांच्यासाठी आपचे तिकीट मागत होतो.

त्रिपाठी यांच्यावतीने मला सांगण्यात आले की तिकीट मिळेल पण ९० लाख रुपये द्यावे लागतील. त्रिपाठी यांनी तिकिटासाठी ९० लाख रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी ३५ लाख रुपये त्यांनी अखिलेश यांचे पती त्रिपाठी यांना आणि २० लाख रुपये वजीरपूरचे आमदार राजेश गुप्ता यांना त्रिपाठी यांच्या सांगण्यावरून दिले असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान या प्रकरणात भाजपचे कारस्थान असल्याचे सांगताना आपचे आमदार त्रिपाठी म्हणाले की ज्याला तिकीट मिळत नाही तो असे आरोप करतोच करतो. भाजप सातत्याने आम आदमी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. कमला नगरमधून अनेक इच्छुक होते. पण येथील समीकरणांनुसार विजयी होऊ शकणाऱया उमेदवारालाच आप चे तिकीट देण्यात आले आहे. या जागेवर बरेच लोक तिकीट मागत होते. वजीरपूर विधानसभा मतदारसंघातील लोकांनी हे आरोप केले आहेत. खारी यांचे भाजप नेत्यांशी संबंध आहेत. ‘मनी पॉवर'च्या जोरावर ते तिकीट मागत आहेत. मात्र चार दिवस अगोदर पक्षात येणाऱ्या व्यक्तीला मनपा निवडणुकीचे तिकीट देणेही योग्य नाही असेही त्रिपाठी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT