भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे. मध्यप्रदेशमधील ११ महानगरपालिका, ३६ नगरपालिका आणि ८६ नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. भोपाळ, इंदौर, ग्वाल्हेर, जबलपूर, सागर, सतना, सिंगरौली, छिंदवाडा, खंडवा, बुरहानपूर आणि उज्जैन या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तर आज पहिल्या टप्प्यातील निकाल लागला आहे. यामध्ये 'आप'ने एका महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला असून मध्यप्रदेशमध्ये आपला पहिल्या महापौराच्या रूपाने नारळ फोडला आहे. (AAP's Victory Over A Municipal Corporation In Madhya Pradesh)
त्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्वीट करत निवडून आलेल्या राणी अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे. मध्य प्रदेशातील सिंगरौली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी विजयी झालेल्या आप उमेदवार राणी अग्रवाल यांच्यासहित सर्व विजेते व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन. असं ट्वीट पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
मध्यप्रदेशमधील सिंगरौली महानगर पालिकेवर 'आप'च्या राणी अग्रवाल यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला आहे. सिंगरौली महानगरपालिका याआधी भाजपच्या हातात होती पण आता 'आप'ने विजय मिळवत मध्यप्रदेशमध्ये आपला पहिला उमेदवार निवडून आणला आहे. राणी अग्रवाल यांनी पहिली निवडणूक २०१४ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून लढवली होती आणि जिंकली होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्या आपकडून निवडणूक लढल्या पण अत्यंत कमी मताने त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये गोवा, पंजाब, उत्तरप्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांचा सामावेश होता. त्यामध्ये आपने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंजाबमध्ये काँग्रेसला पराभूत करून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांची सत्ता आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशमध्ये एक महापौरपदाची जागा जिंकून आम आदमी पार्टीने नारळ फोडला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.