Action for giving car to minors Irresponsible parents can be fined 25 thousand  Esakal
देश

अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास कारवाई; बेजबाबदार पालकांना २५ हजारांचा दंड शक्य

अल्पवयीन पाल्यास दुचाकी किंवा चारचाकी गाडी दिल्यास पालकांना दंड आणि बारा महिन्यांपर्यंत पालकाचा वाहन परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नोएडा, ता. १० (पीटीआय): काही वेळा मुलं गाडी चालविण्याचा हट्ट करतात, परंतु हा हट्ट एखाद्याच्या जीव मुकण्यास कारणीभूत ठरू शकतो. अलीकडच्या काळात अल्पवयीन पाल्यांकडून होणारे अपघात पाहता गौतम बुद्धनगर पोलिसांनी असा लाड पुरविणाऱ्या पालकांना दंड करण्याचा इशारा दिला आहे.

अल्पवयीन पाल्यास दुचाकी किंवा चारचाकी गाडी दिल्यास पालकांना दंड आणि बारा महिन्यांपर्यंत पालकाचा वाहन परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. शिवाय अल्पवयीन मुलास वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन परवाना देण्यास अपात्र घोषित करणे यासारखी सूचना पोलिसांनी दिली आहे.

नोएडा, ग्रेटर नोएडा आणि देशातील अन्य भागात अल्पवयीन चालकांकडून होणारे अपघात पाहता आणि रस्ते सुरक्षेसाठी गौतम बुद्धनगर पोलिस आयुक्तांनी नवे आदेश काढले. १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलगा आणि मुलीकडून दुचाकी आणि चारचाकी चालविण्याबाबत पालकांना कडक तंबी दिली.

नियमाचे पालन न केल्यास २५ हजारांपर्यंत दंड, अल्पवयीन पाल्याच्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई, १२ महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करणे, अल्पवयीन मुलास वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन परवाना न देणे यासारख्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात व्यापक मोहीम राबविली जात असून आयुक्तांचे आदेश हा या मोहिमेचाच भाग आहेत.

या माध्यमातून पालकांनी अल्पवयीन पाल्याच्या हाती गाडी देऊ नये, असे आवाहन केले जात आहे. १८ पेक्षा कमी वयोगटातील पाल्यांना गाडी चालविण्यास सक्त मनाई आहे. लोकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास त्यांना दंड होणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

बंगळूरमध्ये मद्यपी २३ चालकांविरुद्ध कारवाई

बंगळूर वाहतूक पोलिसांनी आज सकाळी राबविलेल्या मोहिमेत स्कूल बस चालविणारे २३ चालक मद्यपान केल्याचे आढळून आले. आज सकाळी वाहतूक पोलिसांनी सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत सुमारे ३०१६ स्कूलबसची तपासणी केली. त्यात २३ चालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चालकांचे वाहन परवाने जप्त करण्यात आले असून ते रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे. शिवाय अकरा स्कूलबसना फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर पुढील कारवाई बंगळूर आरटीओकडून केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT