देश

कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मोटारीच्या धडकेत एक ठार

नगुंद शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग - ५० वरील कुडलसंगम क्रॉसजवळ हा अपघात झाला.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (laxman savadi) यांच्या ज्येष्ठ पुत्राच्या मोटारीने सोमवारी सायंकाळी उशिरा दुचाकीला धडक दिल्याने एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. बगलकोट (bagalkot) तालुक्यातील चिक्कहंदगल खेड्यातील शेतकरी कोडळेप्पा बोळी असे मृताचे नाव आहे. (crimecase) हुनगुंद शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग - ५० (natinal highway 50) वरील कुडलसंगम क्रॉसजवळ हा अपघात झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सवदी यांचा मोठा मुलगा चिदानंद आणि अकरा जण दोन मोटारमधून विजापूरमार्गे अथणीला परतत होते. त्याचवेळी शेतातून घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराला त्यांच्या मोटारीने धडक दिली. चिदानंद त्याच मोटारीमध्ये होते. दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमीला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एका तासाच्या आत ते दगावले. हुनगुंद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी अपघातग्रस्त मोटार ताब्यात घेतली आहे. मात्र, कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. मृताच्या नातेवाइकांनी पोलिस खात्यावर आरोप केला की, पोलिसांनी उपमुख्यमंत्र्याचा मुलगा चिदानंदऐवजी वाहनचालक हनुमंत सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताबद्दल चौकशी न करता त्यांना प्रवास करण्यासही परवानगी दिली. प्रत्यक्षदर्शीने असेही म्हटले आहे की, चिदानंद यांनी त्यांच्या वाहनाची नंबर प्लेट खराब केली आणि घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस येईपर्यंत लोकांनी त्यांना तिथेच थांबवून ठेवले होते.

"माझ्याच मोटारीने अपघात केला, हे मला मान्य आहे; परंतु ती मोटार माझा ड्रायव्हर चालवित होता. मी माझ्या मित्रांसह दुसऱ्या मोटारीत होतो. जे माझ्या मोटारीपासून ३० किलोमीटर अंतरावर होते. अपघाताची माहिती मिळताच मी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात हलविण्यात मदत केली. मी कुठल्याही व्यक्तीला धमकावले नाही किंवा अपघातस्थळापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मानवतेच्या दृष्टीने मी मृत कुटुंबाला मदत करीन."

- चिदानंद सवदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT