Adar Poonalwala Sakal
देश

मंकीपॉक्सच्या वाढत्या चिंतेत अदर पुनावालांचं मोठं विधान; म्हणाले, ''सीरमकडून...''

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आढळून आले असून, यानंतर प्रशासन आणि केंद्र सरकार सावध पावलं उचलताना दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aadar Poonawala On Monkeypox Vaccination : एकीकडे मंकीपॉक्सचा जगासह भारतात धोका वाढत असताना सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाल यांनी काहीसा दिलासा देणारी माहिती दिली आहे. वाढत्या मंकीपॉक्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या विधानानंतर येणाऱ्या काही दिवसात या विषाणुवर लवकरच लसीची निर्मिती होऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल अशी आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वीनी वैष्णव यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर पुनावाला यांनी वरील माहिती दिली आहे.

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आढळून आले असून, वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर प्रशासन आणि केंद्र सरकार सावध पावलं उचलताना दिसून येत आहे. या सर्वामध्ये पुणे येथील आयसीएमआर NIV ने एका रुग्णाच्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणूला वेगळे केले आहे. यामुळे मंकीपॉक्स विषाणूविरोधी लस बनवण्यात मदत होणार आहे.

लस निर्मितीसाठी केंद्राचे कंपन्यांना आवाहन

दरम्यान, जगासह भारतात दिवसेंदिवस गडद होत चाललेल्या मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गानंतर केंद्र सरकारकडून 27 जुलै रोजी भारतीय लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विषाणूचा नमुन्यांवर अभ्यास करून यावर लस विकसित करण्यासाठी आवाहन केलं आहे. त्याशिवाय संबंधित कंपन्यांना विषाणूवरील लस आणि टेस्टिंग किट तयार करण्याचेही आवाहन केले आहे. देशीतील वाढत्या रूग्णसंख्येवर नजर ठेवण्यासाठी समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.

काय म्हणाले अदर पुनावाला

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, 'लवकरच मंकीपॉक्स विषाणुवरील लस उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुरु आहे. सीरमकडून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु असून, येत्या काही महिन्यांत यावर लस उपलब्ध होईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT