Aditya-L1 Mission ISRO scientists offer prayers at Tirumala Sri Venkateshwara Temple watch video  
देश

Video : 'आदित्य एल-1'चं काउंटडाऊन सुरू; प्रक्षेपणापूर्वी इस्रोच्या वैज्ञानिकांनी घेतलं श्री वेंकटेश्वर मंदिरात दर्शन

रोहित कणसे

इस्त्रोने भारताची चांद्रयान-३ ही अत्यंत महत्वकांक्षी मोहिमी यशस्वी ठरल्यानंतर आता सर्व जगाचे लक्ष भारताच्या सुर्य मोहिमेकडे लागले आहे. सुर्याशी संबंधीत माहिती गोळा करम्यासाठी भारताकडून पहिले सौर मिशन आदित्य-एल1 उद्या लाँच करण्यात येणार आहे. या लाँचपूर्वी इस्त्रोमधील शास्त्रज्ञांच्या एका टीमने आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

एएनआय या वृत्तसंस्थेने शास्त्रज्ञांचा व्हिडीओ शेअर केला आहे. इस्त्रो शास्त्रज्ञांची एक टीमvs तिरुमला श्री वेंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. महत्वाचे म्हणजे वैज्ञानिकांनी आदित्य-L1 मिशनची लहनशी प्रतिकृती सोबत घेऊन मंदिरात जात या मोहमेच्या यशासाठी प्रार्थना केली.

भारताची पहिली सौर मोहीम (आदित्य-L1 मिशन) 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून प्रक्षेपित होणार आहे. इस्त्रोच्या PSLV XL या रॉकेटच्या माध्यमातून आदित्य-L1 मिशन सूर्याच्या दिशेनं झेपावणार आहे.

भारत पहिल्यांदाच अंतराळात सूर्य निरीक्षण मोहिम लॉन्च करणार आहे. भारताच्या या आदित्य L1 मिशनचा प्रमुख हेतू हा अंतराळातून सूर्यावरील घडामोडींचं निरीक्षण करणं हा आहे. सूर्याचा अभ्यास करताना त्याची अनुकूल कार्यक्षमता कशी आहे? तसेच सूर्याचं वर्तन आणि त्याच्या वर्तनाचे परिणाम याचा अभ्यास केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी परिवाराच्या आड कधी राजकारण आणलं नाही मात्र... राज ठाकरेंनी 'ती' खदखद बोलून दाखवली!

Sports Bulletin 10th November: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा ते ऋषभ पंतबाबत CSK च्या सीईओने दिली प्रतिक्रिया

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय? नागरिकांना ५ दिवसांआड पाणी अन् व्यापाऱ्यांना पार्किंगची अपेक्षा; विडी उद्योगातील महिलांना मुला-मुलींच्या भविष्याची चिंता

Sharad Pawar: संघटनेत सक्रिय राहून पक्ष बांधणी करणार!

कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत! ओल्या कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण; प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा सरासरी भाव; अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

SCROLL FOR NEXT