Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : ‘आरक्षणाला काँग्रेसचा विरोध होता’

‘आदिवासींच्या आरक्षणाला काँग्रेसचाच विरोध होता. अनेक राज्यांमधील सरकारे रातोरात बरखास्त करून टाकणारे आता आम्हाला लोकशाहीचे ज्ञान सांगत आहेत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ‘आदिवासींच्या आरक्षणाला काँग्रेसचाच विरोध होता. अनेक राज्यांमधील सरकारे रातोरात बरखास्त करून टाकणारे आता आम्हाला लोकशाहीचे ज्ञान सांगत आहेत. काँग्रेसकडूनच फुटीरतावादाला खतपाणी घातले जाते आहे,’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चाळीस तरी जागा मिळतील का, असा टोला हाणतानाच पंतप्रधानांनी ‘मोदी.३ कालावधीत विकसित भारताचा पाया आणखी मजबूत केला जाईल,’ अशी ग्वाही देत विजयाचा विश्‍वासही व्यक्त केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत उत्तर दिले. ‘काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा आशीर्वाद दिला आहे.

तिकडे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी तुम्हाला किमान ४० जागा जिंकून दाखवा असे आव्हान दिले आहे. त्यामुळे काँग्रेस ४० पेक्षा जास्त जिंकेल, अशी प्रार्थना मी केली आहे,’ असा टोला मोदींनी हाणला. केंद्र सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेताना मोदींनी काँग्रेसवर खरपूस टीका केली.

ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचाच नकार होता. केंद्रात वाजपेयी सरकार आल्यानंतर डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. दलित-आदिवासींच्या आरक्षणात काँग्रेसने नेहरूंच्या काळापासून खोडा घातला आहे. काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेमुळेच लोकशाहीचा गळा घोटला गेला.

काँग्रेसने असंख्य राज्य सरकारांना रातोरात बरखास्त करुन टाकले, वृत्तपत्र कार्यालयांना टाळे लावले. आता हीच काँग्रेस आम्हाला लोकशाहीचे ज्ञान देऊ पाहत आहे. देश तोडण्यासाठी काँग्रेस वेगवेगळ्या अफवा पसरवित आहे. दक्षिण विरुद्ध उत्तर भारत असे राजकारण केले जात आहे. भाषेच्या आधारावर देशाचे विभाजन केले जात आहे.

याच काँग्रेसने फुटीरतावाद आणि दहशतवादाला खतपाणी घातले आहे.’ काँग्रेसने सामान्य वर्गातील गरिबांना कधीही आरक्षण दिले नाही. उलट पंडित नेहरु यांनी पंतप्रधान असताना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आपण आरक्षणाविरोधात असल्याचे सांगितले होते, असा दावा मोदी यांनी केला.

‘ज्यांची गॅरंटी नाही, त्यांच्याकडून टीका’

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ज्या काँग्रेसने गल्ली बोळातील रस्त्यांना आपल्या कुटुंबातील लोकांची नावे दिली, ते सामाजिक न्यायावर आम्हाला भाषण देत आहेत. आमच्या काळात देशाची अर्थव्यवस्था पहिल्या पाचमध्ये आली आहे. लोक उगाच आम्हाला आशीर्वाद देत नाहीत. हे लोक ‘व्होकल फॉर लोकल’ बोलण्यास कचरतात. काँग्रेसच्या काळात धापा टाकणाऱ्या सार्वजनिक कंपन्या आता चांगला नफा कमवित आहेत. ज्या काँग्रेसी नेत्यांची गॅरंटी राहिलेली नाही, ते लोक मोदीच्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.’

मोदी म्हणाले

  • देशाची संस्कृती,सभ्यतांना मानणाऱ्यांना काँग्रेसकडून हीनपणाची वागणूक

  • काँग्रेसने आपल्या युवराजाला स्टार्टअप बनवले आहे. मात्र हे स्टार्टअप ‘नॉन स्टार्टर’ आहे

  • काँग्रेसने देशाची जमीन शत्रूला दिली, लष्कराचे आधुनिकीकरण रोखले

  • राज्यांच्या विकासाकडे केंद्र सरकारचे लक्ष

  • राज्यांनी सकारात्मक विचार घेऊन चालले पाहिजे

  • मी स्वतंत्र भारतात जन्मलो आहे, त्यामुळे माझे विचार, स्वप्नेही स्वतंत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT