Heat Wave North India 
देश

Heat wave North India: उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेबाबत अॅडव्हायझरी जाहीर; या गोष्टींचं पालन करण्याच्या सूचना

एकीकडं मॉन्सूननं भारतात हजेरी लावलेली असताना उत्तर भारतातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : एकीकडं मॉन्सूननं भारतात हजेरी लावलेली असताना उत्तर भारतातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट आली आहे. अनेक भागात ४५ ते ४६ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचलं आहे. त्यामुळं नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला स्थानिक प्रशासनानं दिला आहे. तसंच दिल्लीत तर या उष्णतेच्या लाटेमुळं अनेक विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवी अॅडव्हाझरी जाहीर केली आहे. (Advisory announced regarding heat wave in North India by MoHFW)

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दरभंगाला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात प्रवाशांना तासभर विनाएसी थांबावं लागलं. बाहेर प्रचंड उष्णतेची लाट असल्यानं या प्रवाशांना उकाड्यानं हैराण केलं होतं. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर स्पाईसजेटची ही फ्लाईट SG476 सकाळी ११ वाजता वेळेत निघाली.

दिल्लीत बोर्डिंग करताना, एअरोब्रिजवरून बोर्डिंग होत नसल्यामुळं बाहेरील तीव्र उष्णतेमुळं आणि विमानाचे दोन्ही दरवाजे उघडे असल्यामुळं एअर कंडिशनिंग सुरुवातीला काहीकाळ बिघडलं होतं. बोर्डिंग पूर्ण झाल्यानंतर दरवाजे ताबडतोब बंद करण्यात आले आणि त्यानंतर कूलिंग सामान्यपणे चालू झालं, असं स्पष्टीकरण स्पाइसजेटच्या प्रवक्तांनी दिलं आहे.

दरम्यान, एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी सांगितलं की, सध्या ९ रुग्ण आमच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. यांपैकी ४ जण हे व्हेटिंलेटरवर आहेत. हिटस्ट्रोकमुळं त्यांच्या शरिरातील अनेक अवयव निकामी झाले आहेत. १६ जून रोजी हिटस्ट्रोकमुळं एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. हिटस्ट्रोकचा त्रास झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणं खूप गरजेचं आहे. कारण जर अशा पद्धतीनं उपचार मिळाले नाहीत तर त्याचा परिणाम त्यांच्या अवयवांवर होतो. यासाठी दररोज ४-५ पाच लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तसंच लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी घराबाहेर पडू नये असा सल्लाही देण्यात आला आहे.

अॅडव्हाझरीत काय म्हटलंय?

१) शरिरातील पाण्याचं योग्य प्रमाण राखण्यासाठी पुष्कळ पाणी प्या

२) उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणूम सौम्य रंगाचे कपडे परिधान करा

३) डोक्यात कायम टोपी घाला किंवा हेडगिअरनं डोकं झाकून घ्या.

४) दुपारच्यावेळेत घराबाहेर असताना खूपच अंगमेहनतीचं काम करु नका.

५) एखाद्याला हिटस्ट्रोकचा त्रास झाला असेल तर त्याला आईस्क्रीम खायला द्या, थंड पाणी प्यायला द्या.

६) अशा व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT