नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन हायकोर्टानं रद्द केल्यानंतर त्यांना सीबीआयनं आज अटक केली. यानंतर केजरीवाल यांच्या रक्तातील साखर अचानक कमी झाली, त्यामुळं त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना काही काळ कोर्टरुममधून बाहेर नेण्यात आलं आणि चहा-बिस्कीट देण्यात आलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. (After arrest by CBI Delhi CM Arvind Kejriwal Sugar Drop at courtroom need to know what exactly happened)
दिल्लीच्या अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं बुधवारी चौकशीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. सीबीआयनं अटकेनंतर राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात हजेरीनंतर केजरीवाल यांची तब्येत बिघडली.
दरम्यान, केजरीवालांना सीबीआयनं अटक केल्यानंतर आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटलं की, "यामागचा हेतू स्पष्ट आहे की, कोणत्याही स्वरुपात केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवायचं आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे, हा अन्याय आहे. ही राजकीय बदल्यासाठी केली जाणारी कारवाई आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.