Vodafone Idea Acquire Spectrum Sakal
देश

Vodafone Idea : जिओ अन् एअरटेलनंतर वोडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका; 21 टक्क्यांनी वाढवले रिचार्ज प्लॅन

संतोष कानडे

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनंतर वोडाफोन आयडियाने ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले आहेत. पोस्टपेड आणि प्री-पेड दोन्ही ग्राहकांसाठी कंपनीने शुक्रवारी नवीन प्लॅनची घोषणा केली आहे.

वोडाफोन आयडियाचे नवीन प्लॅन ४ जुलैपासून लागू होणार आहेत. कंपनीने मोबाईल रिचार्ज प्लॅन्सना १० ते २१ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनला आता १७९ रुपयांऐवजी १९९ रुपये मोजावे लागणरा आहे. तर २८ दिवसांसाठी प्रतिदिवस १ जीबी डेटा असलेल्या प्लॅनचे दर २६९ वरुन २९९ रुपये करण्यात आलेले आहेत.

कंपनीने ८४ दिवसांच्या दीड जीबी डेटाच्या प्लॅनची किंमत ८५९ इतकी केली आहे, जो सध्या ७१९ रुपये इतका होता. तर एवढ्याच दिवसांसाठी २ जीबी प्रतिदिवस असलेल्या प्लॅनची किंमत ८३९ रुपयांवरुन ९७९ इतकी करण्यात आलेली आहे.

वोडाफोन आयडियाने आपल्या ३६५ दिवसांच्या प्लॅनचे दर वाढून ३४९९ रुपये केले आहेत. जो प्लॅन सध्या २८९९ रुपयांचा आहे. यासह डेटा अॅड ऑन पॅकमध्ये कंपनीने १ जीबी डेटाचे दर १९ रुपयांवरुन २२ रुपये केले आहेत. तर ६ डीबी डेटाचे दर ३९ रुपयांवरुन ४८ रुपये केले आहेत.

वोडाफोनने सांगितलं की, ४ जीबी डेटाची सेवा उत्तम देण्याबरोबरच ५ जीबी डेटा सेवा देण्यासाठी पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या गुंतवणुकची योजना कंपनी करत आहे. एन्ट्री लेव्हल युजर्सना लक्षात घेऊन आपले एन्ट्री लेव्हल प्लॅनमध्ये किरकोळ वाढ केल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion : आधी निर्यातबंदी, आता अफगाणिस्तानमधून कांदा आयात; शेतकरी हवालदिल

Vidhansbha Election : ठाकरेंपासून शाहांपर्यंत 'विदर्भ' विधानसभेचं हॉटस्पॉट का ठरतंय?

Prithviraj Chavan : मनोज जरांगेंना काही इजा झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार

India vs Germany: कांस्य पदक विजेत्या भारतासमोर आता रौप्यपदक पटकावणाऱ्या जर्मनीचे आव्हान

Elon Musk: इलॉन मस्क अन् पंतप्रधान मेलोनी करताएत डेट? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT