नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये राजधानी दिल्लीत सोमवारी गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीए विरोधात तिसरी आघाडी स्थापन्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार यांनी उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता विरोधीपक्षांची बैठक बोलावली आहे. यासाठी १५ राजकीय पक्षांना या बैठकीचं निमंत्रणही पाठवण्यात आलं आहे. टाइम्सनाऊ न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (after Prashant Kishor visit Sharad Pawar called a meeting of the Opposition Parties tomorrow)
'राष्ट्र मंच'च्या बॅनरखाली होणार बैठक
तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या पॉलिटिकल अॅक्शन ग्रुप 'राष्ट्र मंच'च्या बॅनरखाली शरद पवार यांच्या त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन, सपाचे नेते घनश्याम तिवारी आणि इतर नेते या बैठकीत सामिल होणार आहेत, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने टाइम्सनाऊ न्यूजने दिली आहे.
प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामध्ये प्रामुख्याने तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला पर्याय म्हणून तयार होत असलेल्या या तिसऱ्या आघाडीत प्रादेशिक पक्ष एकत्र येण्यास तयार असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली होती गरज
दरम्यान, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात विस्तृत आघाडी निर्माण करण्यावर भर दिला होता. तर गेल्या महिन्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, राष्ट्रीय स्तरावर विरोधीपक्षांच्या आघाडीची गरज असून आपण याबाबत शरद पवार यांच्याशी बोललो आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.