JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha Sakal
देश

BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

ध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने तीनशेचा आकडा पार केला तर अध्यक्षपद खट्टर यांच्याकडे दिले जाऊ शकते. मात्र भाजपचा त्यापेक्षा कमी जागांवर विजयी झाल्यास अध्यक्षपदाची धुरा धर्मेंद्र प्रधान अथवा भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली जाऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

JP Nadda News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये व्यापक फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्यातरी या पदासाठी धर्मेंद्र प्रधान, भू​पेंद्र यादव आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वीच संपला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल.

या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने तीनशेचा आकडा पार केला तर अध्यक्षपद खट्टर यांच्याकडे दिले जाऊ शकते. मात्र भाजपचा त्यापेक्षा कमी जागांवर विजयी झाल्यास अध्यक्षपदाची धुरा धर्मेंद्र प्रधान अथवा भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली जाऊ शकते.

प्रधान आणि यादव हे मावळत्या मोदी सरकारमधील मंत्री आहेत. संघटनात्मक कामाचा दोन्ही नेत्यांना दीर्घ अनुभव आहे. आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मागील काही काळात राज्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. हे लक्षात घेत एखाद्या मराठी नेत्याकडे भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी देणार काय, हेही पाहण्यासारखे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT