after supporting pm narendra modi government JDU pressure special category status for Bihar Sakal
देश

JDU Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर बिहारला विशेष दर्जासाठी ‘जेडीयू’चे दबावतंत्र

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी जेडीयूने दबाव वाढविण्यास सुरवात केली आहे. जेडीयूची राष्ट्रीय कार्यकारिणी आज दिल्लीत पार पडली. यात या मागणीचा ठराव संमत करण्यात आला. दरम्यान, संजय झा यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

लोकसभेनंतर पहिल्यांदाच जेडीयूची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित होते. आज जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बिहारला विशेष दर्जाचा प्रस्ताव संमत करण्यात आला.

काही कायदेशीर कारणांमुळे विशेष दर्जा देणे शक्य नसल्यास एक विशेष आर्थिक पॅकेज घोषित करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच झारखंड विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान संजय झा यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करणे एनडीएमधील ‘टर्निंग पॉइंट’ मानले जात आहे.

संजय झा कार्यकारी अध्यक्ष

जेडीयूचे खासदार संजय झा यांची आज पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री लल्लन सिंग यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. आता सहा महिन्यानंतर नव्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार संजय झा यांची निवड करण्यात आली आहे. जेडीयूला एनडीएमध्ये सामील करून घेण्यात खासदार संजय झा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - रितेशने सांगितलं शेवटचे दोन आठवडे नसण्याचं कारण

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Latest Maharashtra News Updates: पियुष गोयल यांच्या हस्ते मालाडमधील मनपा शाळेचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT