Uttarakhand CM Pushkar Singh Dhami esakal
देश

Madrasa Survey : CM धामींचं योगींच्या पावलावर पाऊल; यूपीनंतर आता उत्तराखंडमध्येही होणार मदरशांचं सर्वेक्षण

'सरकार ज्या मदरशांना पैसं देतं, त्यांची चौकशी करण्याचा अधिकार सरकारला आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'सरकार ज्या मदरशांना पैसं देतं, त्यांची चौकशी करण्याचा अधिकार सरकारला आहे.'

डेहराडून : उत्तर प्रदेशातील योगी सरकारप्रमाणंच (Yogi Government) आता उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) सरकारही राज्यातील मान्यताप्राप्त मदरशांचं (Madrasa) सर्वेक्षण करणार आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे (Uttarakhand Waqf Board) अध्यक्ष शादाब शम्स यांनी याला दुजोरा दिलाय.

दरम्यान, आजपासून उत्तर प्रदेशात अनोळखी मदरशांच्या सर्वेक्षणाचं काम सुरू झालंय. त्याच धर्तीवर उत्तराखंड सरकारनंही हा निर्णय घेतलाय. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स (Shadab Shams) म्हणाले, 'सरकार ज्या मदरशांना पैसं देतं, त्यांची चौकशी करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्या मदरशांचं सर्वेक्षण करणं हाही त्याचाच एक भाग आहे. सरकारच्या पैशातून मुस्लिम विद्यार्थ्यांना मदरशांमध्ये शिक्षण, भोजन आणि इतर सुविधा मिळतात की नाही? मदरशांमध्ये शिक्षक आहेत का? मदरशांना इमारती आहेत की नाही? याचं सर्वेक्षण केलं जाणार आहे.'

103 मदरशांचं होणार सर्वेक्षण

शम्स पुढं म्हणाले, संपूर्ण राज्यात 500 हून अधिक मदरसे कार्यरत आहेत. त्यापैकी 103 मदरसे वक्फ बोर्ड अंतर्गत येतात. या मदरशांना सरकारकडून पैसा दिला जातो. याअंतर्गत वक्फ बोर्ड उत्तराखंडमधील आपल्या सर्व 103 मदरशांचं सर्वेक्षण करणार असून त्यामध्ये राज्य सरकारच्या सर्व सुविधा कशा वापरल्या जात आहेत, याची चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT