कोरोना (corona) विषाणूला वेळीच रोखायचं असेल तर लसीकरण (corona-vaccine) करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सध्या देशात युद्धपातळीवर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला लस देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर लसीकरणासंदर्भात अनेक अफवा पसरत आहेत. ज्यांमुळे भीतीपोटी अनेक जण लस घेण्यास नकार देत आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही झालं तरी लस घेणार नाही, असं म्हणत त्या त्यांच्या निश्चयावर अडून आहेत. (aged-women-denied-to-vaccinate-herself-think-that-she-will-die-after-taking-corona-vaccine)
सध्या सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. लस घेण्यावरुन त्या चांगल्याच संतापल्या आहेत. काही झालं तरी लस घेणार नाही अशी ठाम भूमिका या आजींनी घेतली आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मत दर्शवलं आहे.
काय आहे आजींचं म्हणणं?
काही दिवसांपूर्वी आजींनी कोरोनाची पहिली लस घेतली होती. त्यामुळे आता लशीचा दुसरा डोस घ्यावा यासाठी त्यांना विनवणी करण्यात येत आहे. मात्र, काही झालं तरी लशीचा दुसरा डोस घेणार नाही असं या आजींनी ठामपणे सांगतांना दिसत आहेत. लशीचा दुसरा डोस घेतला तर माझा मृत्यू होईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी लस घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर लसीबद्दल चुकीची माहिती पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. ज्यामुळे अनेक जण लस घेण्यास नकार देत आहेत. या आजीदेखील यातलंच एक उदाहरण आहेत. चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी लस घेण्यास नकार दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात असून अनेक नेटकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका अशी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच प्रशासन व आरोग्य यंत्रणादेखील वारंवार नागरिकांमध्ये जनजागृतीचं काम करत आहेत. सत्यता पडताळल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.