Sonia Gandhi 
देश

'अग्निपथ' दिशाहीन पाऊल; सोनिया गांधींचं तरुणांना शांततेचं आवाहन

योजना जाहीर झाल्यापासून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ या कंत्राटी लष्कर भरतीय योजनेनं सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना अनेक तरुण रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करत आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तरुणांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं असून अग्निपथ योजना हे सरकारचं दिशाहीन पाऊल असल्याचं म्हटलं आहे. (Agneepath sceme directionless Sonia Gandhi call to youth for peacefull protest)

सोनिया गांधी या सध्या आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण त्यांनी आपला संदेश काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याद्वारे तरुणांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवला आहे. सोनिया गांधी यांची भूमिका मांडणारं एक पत्रच रमेश यांनी प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात सोनिया गांधी म्हणतात, "माझ्या प्रिय तरुण सहकाऱ्यांनो, तुम्ही भारतीय सैन्यात सामिल होऊन देशसेवेचं महत्वपूर्ण काम करण्याची आशा बाळगता. सैन्यात लाखो पदं रिक्त असतानाही गेल्या तीन वर्षात भरती न झाल्याचं दुःख मी समजू शकते. हवाई दलात भरती परीक्षा देऊन निकाल आणि नियुक्तीची वाट पाहत असलेल्या तरुणांप्रती देखील मी सहानुभूती व्यक्त करते"

मला याचं दुःख आहे की, सरकारनं तुमच्या आवाजाकडं दुर्लक्ष करत नव्या लष्कर भरती योजनेची घोषणा केली. सरकारचं हे पाऊल पूर्णपणे दिशाहीन आहे. तुमच्यासह अनेक माजीसैनिकांनी आणि संरक्षण तज्ज्ञांनी देखील या योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं.

काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत सक्षमपणे उभा असून ही योजना रद्द करण्यासाठी संघर्ष करणे आणि तुमच्या हिताचं रक्षण करण्याचा दावा करतो. एका खऱ्या देशभक्ताप्रमाणं सत्य, अहिंसा, संयम आणि शांतीच्या मार्गानं चालत आम्ही सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की, आपल्या योग्य मागण्यासाठी शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गानं आंदोलन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT