Agnipath Protest  Sakal
देश

Agnipath Protest : पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू, बहिणीप्रमाणे करायची होती देशसेवा

केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागात विरोध केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme ) देशातील अनेक भागात विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी या योजनेला विरोध म्हणून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला (Protest) हिंसक वळन लागले आहे. बिहारमध्ये आंदोलकांनी हिंसक होत अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काल सिकंदराबाद येथे आंदोलनामध्ये बहिणीप्रमाणे देशसेवेत भरती होऊन सेवा करणाऱ्या तरूणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. (Agnipath Protest News)

दामोदर राकेश (वय 21) असे आंदोलनादरम्यान गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. आम्हाला आमच्या मुलाला आर्मी ऑफिसर (Army Officer) म्हणून पाहायचे होते, पण आमच्याच पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेल्याचे दामोदरच्या वडिलांनी सांगितले. वारंगलच्या डबीरपेठ गावात राहणारा राकेश अनेक दिवसांपासून सैन्यात भरतीसाठी तयारी करत होता.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या सैन्य भरतीसाठी त्याने फिटनेस टेस्टही (Fitness Test) पास केली होती. 2020 मध्ये यासंबंधी लेखी परीक्षा होणार होती, पण कोरोनामुळे (Corona) ती पुढे ढकलण्यात आली. लवकरच लेखी परीक्षा होईल आणि सैन्यात भरती होईल, अशी आशा राकेशला होती. पण लेखी परीक्षा रद्द झाल्याचे कळताच त्याला खूप धक्का बसला आणि कामाच्या बहाण्याने गुरुवारी तो घराबाहेर पडला.

बहिणीप्रमाणे करायची होती देशसेवा

राकेशची मोठी बहीण सीमा सुरक्षा दलात कार्यरत असून, तिच्याप्रमाणे राकेशलाही सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी राकेशने सैन्य भरतीची तयारी सुरू केली. मात्र, राकेशचे स्वप्न पूर्ण होऊन शकले नाही.

...तर अभिमान वाटला असता

केंद्राच्या अग्निपथ योजनेला देशभरातून मोठा विरोध केला जात आहे. सिंकदराबाद येथेदेखील या योजनेला मोठा विरोध झाला. त्यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी 15 राऊंड फायर केले. यामध्ये 12 जण जखमी झाले. तर, राकेशला छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आमचा मुलगा शत्रूच्या गोळ्यांचा बळी असता तर, आम्हाला अभिमान वाटला असता, पण आमच्याच पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेला याचं दुःख आहे.

कुटुंबाला 25 लाखांची भरपाई

दरम्यान, तेलंगणात अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शनादरम्यान विद्यार्थी राकेशच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी राकेशच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरीची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT