नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळं सध्या देशभरात हिंसक आंदोलन सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी संरक्षण स्थायी समितीची तातडीची बैठक बोलावण्याची विनंती समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अग्निपथ योजनेबद्दल या बैठकीत चर्चा आणि उहापोह करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Agnipath scheme Congress MP KC Venugopal urges urgent meeting of Standing Committee on Defence)
केसी वेणुगोपाल हे संरक्षण स्थायी समितीचे सदस्य असून त्यांनी समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं की, सध्या देशभरात केंद्राच्या अग्निपथ नोकर भरती योजनेवरुन हिंसक आंदोलने सुरु आहेत. तरुणांमध्ये या सेवेतील कंत्राटी भरतीमुळं मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे.
त्याचबरोबर परंपरेनं सैन्य भरतीत मिळणारे फायदे आणि सुविधा या योजनेमध्ये मिळणार नसल्यानं या नोकरीत विविध धोके आहेत. तसेच केवळ सहा महिन्यांत पुरेसं ट्रेनिंग मिळणार नसल्यानं सहाजिकच या योजनाला वाईट पद्धतीनं सादर करण्यात आली असून ही योजना तयार करताना विविध तज्ज्ञांचा किंवा सल्लगारांशी चर्चा करण्यात आली नाही.
यापार्श्वभूमीवर अग्निपथ योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी संरक्षण स्थायी समितीची तातडीची बैठक बोलावण्यात यावी. त्याचबरोबर या बैठकीसाठी सर्व संबंधित महत्वाच्या व्यक्ती तसेच संरक्षण तज्ज्ञांना बोलावण्यात यावं, यामध्ये त्यांची मत आणि काही सल्ले जाणून घेण्यात यावेत, असं खासदार केसी वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.