BJP MLA Chhote Lal Verma esakal
देश

Agra : बलात्कार, गर्भपात आणि नंतर दुसरं लग्न.. भाजप आमदारासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

भाजप आमदार आणि त्याच्या मुलाविरुद्ध बलात्कार, गर्भपात, दुसरं लग्न अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजप आमदार आणि त्याच्या मुलाविरुद्ध बलात्कार, गर्भपात, दुसरं लग्न अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील (Agra) फतेहाबाद विधानसभा मतदारसंघाचे (Fatehabad Assembly Constituency) भाजप आमदार छोटे लाल वर्मा (BJP MLA Chhote Lal Verma) आणि त्यांचा मुलगा लक्ष्मीकांत वर्मा यांच्याविरोधात शारीरिक छळ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीकांतच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलीय. पीडितेच्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध भादंवि कलम 376 (बलात्कार), 313 (गर्भपात घडवून आणणं), 323 (मारहाण), 504 (अत्याचार), 506 (ठार मारण्याची धमकी), 494 (पहिली पत्नी हयात असताना दुसरं लग्न करणं), 328 (विष किंवा मादक पदार्थ खायला देणं) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिला लग्नाचं आमिष दाखवून ब्लॅकमेल केलं

पीडितेच्या आरोपांनुसार, जेव्हा ती 17 वर्षांची होती, तेव्हा तिची वर्मा यांच्या मुलीशी मैत्री होती. पीडिता तिला भेटण्यासाठी वर्मा यांच्या घरी जात असे. तेव्हा वर्मा यांच्या मुलीनं पीडितेची लक्ष्मीकांत वर्मा याच्याशी ओळख करून दिली. 2003 मध्ये लक्ष्मीकांतनं पीडितेला घरी बोलवलं होतं. तिथं शीतपेयात मादक पदार्थ मिसळून ते तिला पाजण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ देखील बनवला. त्यानंतर त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवून ब्लॅकमेल केलं. ते बराच काळ सुरू होतं. यात छोटे लाल वर्मा यांनी लक्ष्मीकांत याची या सगळ्यात साथ दिल्याचा आरोप पीडितेनं केला आहे.

लक्ष्मीकांतनं 2006 मध्ये दुसऱ्या महिलेशी लग्न केलं

लक्ष्मीकांतनं पीडितेला अनेकदा मारहाण केली. तिचा जबरदस्तीनं गर्भपात देखील करवला. त्यानंतर एका मंदिरात या दोघांनी लग्न केलं. मात्र, लक्ष्मीकांतनं 2006 मध्ये दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. त्यानंतरही पीडितेवर अत्याचार करत राहिला. त्यानं तिच्या मुलांनाही मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. पोलिसांनी या दोघांविरोधात बलात्कार, गर्भपात करवणं, मारहाण, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी देणं, पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह करणं आणि विषप्रयोग किंवा अंमली पदार्थ खाऊ घालणं अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT