Agra Woman Seeks Divorce over Makeup : सासू-सुनेची भांडणं, त्यातून उडणारे खटके आणि घटस्फोटाची मागणी अशा गोष्टी नवीन नाहीत. 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीप्रमाणे कित्येक घरांमध्ये सासू आणि सुनेचा वाद होताना दिसतो. आग्र्यातील एका महिलेने देखील अशाच वादामुळे घटस्फोटाची मागणी केली आहे. मात्र, या वादाचं कारण ऐकून पोलिसांनाही हसू कि रडू कळेना झालंय.
आपल्या मेकअपचं सामान आपल्या परवानगीशिवाय सासू वापरते, म्हणून या महिलेने घटस्फोटाची मागणी केली आहे. मेकअपच्या सामानावरुन भांडण झाल्यानंतर तिला आणि तिच्या बहिणीला सासूने काढल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे.
आग्र्यातील मालपुरामध्ये राहणाऱ्या या दोन बहिणींचं एकाच घरात दोन भावांशी लग्न झालं होतं. आठ महिन्यांपूर्वी हे लग्न झालं होतं. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेच्या लक्षात आलं की सासू आपल्याला न विचारचा आपलं मेकअपचं सामान वापरत आहे. सासू घरातच मेकअप करुन, आवरुन बसते. सासूने मेकअप संपवल्यामुळे ऐन वेळी एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्याला मेकअप करता येत नव्हता, असंही तिने म्हटलं आहे.
मेकअपच्या सामानावरुन सासू आणि सुनेमध्ये भरपूर वाद वाढू लागले. यानंतर सासूने आपल्या मुलाला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आपल्या पतीनेही आपल्याला मारहाण सुरू केल्याचं या महिलेने सांगितलं. दोन महिन्यांपूर्वी तर पती आणि सासूने आपल्याला आणि आपल्या बहिणीला देखील घराबाहेर काढलं. तेव्हापासून दोघी माहेरी राहत असल्याचं या महिलेने सांगितलं.
यानंतर महिलेने मालपुरा पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर आग्रा पोलिसांच्या 'परिवार परामर्श केंद्रा'ने या महिलेला आणि तिच्या सासूला रविवारी समुपदेशन केंद्रावर बोलावलं. यावेळी ही महिला घटस्फोटावर ठाम असल्याची माहिती अमित गौर या समुपदेशकाने दिली.
हा मुद्दा आता केवळ मेकअपपुरता मर्यादित नाही. आपला पती केवळ आईचं ऐकून आपल्याला मारहाण करत असल्यामुळे हा घरगुती हिंसाचाराचा मुद्दा असल्याचं या महिनेने म्हटलं आहे. या महिलेला आणि तिच्या पतीला पुन्हा एकदा समुपदेशनासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती गौर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.