देश

अमेठीत तयार होणार AK 203 रायफल; 10 वर्षांचा करार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान आज सोमवारी एक मोठा करार झाला आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान जवळपास 6 लाख एके 203 रायफलच्या निर्मितीसंदर्भातील कलाश्निकोव डील झाली आहे. या कराराअंतर्गत भारतामध्ये जवळपास सहा लाख एके 203 रायफल्सची निर्मिती करण्यात येणार आहे. या करारावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोयगू यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलंय की, अलिकडच्या वर्षांमधअये भारत आणि रशिया दरम्यानचा संरक्षण करार अभूतपूर्व गतीने पुढे सरकत आहे.

रशियन समकक्षांसोबत झाली 2+2 वार्ता

संरक्षण मंत्र्यांनी अशी आशा व्यक्त केली की रशिया आव्हानात्मक परिस्थितीमध्ये नेहमीच भारताचा प्रमुख सहकारी राहिला आहे. याआधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांनी आपले रशियन समकक्ष असलेल्या सर्गेई लावरोव तसेच सर्गेई शोयगू यांच्यासोबत 2+2 वार्ता केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन देखील भारतात येणार आहेत. पुतीन एअर डिफेन्स मिसाईल एस 400 चे एक मॉडेल सुपूर्द करणार आहेत.

बैठकीत अफगाणिस्तानवरही चर्चा

रशियन शिष्टमंडळासोबत चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे आशियासहित इतर संपूर्ण भागावरच त्याचा प्रभाव पडेल. समुद्री संरक्षण हा एक चिंतेचा मुद्दा आहेच. दुसरीकडे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारतात येतील. 'टू-प्लस-टू' वार्तानंतर पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या शिखर संमेलनामध्ये दोन्ही मंत्री पुतीन यांच्यासोबत सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT