Agriculture Success Story : हरियाणा हे कृषीप्रधान राज्य आहे. येथील शेतकरी पशूपालनासोबतच भात, गहू, मोहरी आणि हरभरा या पारंपरिक पिकांचीच लागवड करतात असं लोकांना वाटतं. पण असं नाहीये. इतर राज्यांप्रमाणे येथील शेतकरीही फळे आणि भाजीपाल्याचे बंपर पीक घेतात.
येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला इतर राज्यांनाही पुरवला जातो. यामुळे येथील शेतकरी आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करत आहेत.असेच एक शेतकरी कुलदीप बुरा यांनी भाजीपाला लागवडीतून वर्षभरात लाखोंचं उत्पन्न घेतलं आहे. त्यामुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श बनलेत. इतर शेतकरी त्यांच्याकडून भाजीपाला लागवडीचे बारकावे, प्रशिक्षण घेत आहेत.
वृत्तानुसार, कुलदीप बुरा हे हिसार जिल्ह्यातील घिरई गावचे रहिवासी आहेत. पूर्वी ते इलेक्ट्रिकल फिटिंग व रिपेअरिंगचे काम करायचे. मात्र यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना शेती करायचं ठरवलं.
मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रथम एक एकरमध्ये हिरव्या भाज्या आणि फळांची लागवड करण्यास सुरुवात केली. यातून त्याला चांगले उत्पन्न मिळाले. यानंतर त्यांनी हळूहळू भाजीपाल्याचे क्षेत्र वाढवले. सध्या कुलदीप बुरा यांनी 16 एकर जमिनीवर काकडी, टरबूज, काकडी यासह अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड केली असून, यातून त्यांना वर्षभरात 25 ते 30 लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
सन 2102 पासून भाजीपाला लागवड
कुलदीप बुरा यांनी सांगितले की, ते 2102 सालापासून भाजीपाल्याची शेती करत आहेत. त्यांनी अनेकांना नियमित रोजगार दिला आहे. त्यांच्या शेतात 22 महिला काम करतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की कुलदीप बुरा यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या घरचीच चूल पेटत नाही ते 22 लोकांच्या घराचीही चूल पेटते.
कुलदीपची मुलगी मंजू संपूर्ण शेतीचा हिशोब करते. मंजू व्यवहाराचा संपूर्ण तपशील हाताळते. तर मुलगा मुनीश अजून शिक्षण घेतोय. उरलेल्या वेळेत तो वडिलांना शेतीत येऊन मदत करतो.
2014 मध्येच त्यांनी नेट हाऊसमध्ये शेती करण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे कुलदीप बुरा हे शास्त्रोक्त पद्धतीने शेती करतात. 2014 मध्येच त्यांनी नेट हाऊसमध्ये शेती करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना हरियाणा सरकारकडून अनुदान मिळाले. नेट हाऊसमध्ये शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळते, असे ते सांगतात. मात्र, अनेकवेळा त्यांना हवामानाच्या तडाख्यालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे आर्थिक नुकसानही होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.