Ahmedabad Serial Blast Case esakal
देश

70 मिनिटं 21 बॉम्बस्फोट, 56 जणांचा मृत्यू, 13 वर्षानंतर न्याय!

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 38 दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावलीय.

2008 Serial Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 38 दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादमधील न्यायालयानं (Ahmedabad Court) 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 26 जुलै 2008 साली अहमदाबादमध्ये तासाभरात 21 बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात 13 वर्षांनी न्यायालयाचा निकाल आला.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 49 जण दोषी

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 9 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यामध्ये सहा हजार कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीत आतापर्यंत नऊ न्यायाधीश बदलले आहेत. त्याचबरोबर 1117 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. अहमदाबादमध्ये 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरातमधील विशेष न्यायालयानं निकाल देताना 77 पैकी 49 जणांना दोषी ठरवलं, तर 28 जणांना निर्दोष घोषित केलं. या बॉम्बस्फोटाच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता, तर 56 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता. चला तर, जाणून घेऊया या संबंधित 10 मोठ्या गोष्टी..

  • Ahmedabad Serial Blast Case : 26 जुलै 2008 साली अहमदाबादमध्ये तासाभरात 21 बॉम्बस्फोट झाले होते. या 70 मिनिटांच्या कालावधीत 56 लोकांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते.

  • या घटनेला 13 वर्षांहून अधिक काळ लोटला. या वर्षी 8 फेब्रुवारी रोजी 49 जणांना दोषी ठरवण्यात आलं आणि 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

  • UAPA कायद्यांतर्गत आरोपींना जन्मठेप आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. कायद्याच्या इतर कलमांखालीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 77 आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण केली.

  • या घटनेत 78 आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. या गुन्हेगारांचा संबंध इंडियन मुजाहिद्दीन (Indian Mujahideen) या दहशतवादी संघटनेशी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

  • 2002 च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला होता.

  • एनआयएच्या विशेष न्यायालयानं रांची येथील मंजर इमाम आणि दानिश रियाझ यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.

  • 2011 मध्ये गुजरात एटीएसनं बरियातू परिसरात राहणाऱ्या मंजर इमाम आणि दानिश रियाझ यांच्या घरावर छापा टाकला होता आणि जून 2011 मध्ये दानिशला गुजरातमधील वडोदरा स्टेशनवरून अटक केली होती. मार्च 2013 मध्ये मंजर इमामला रांचीच्या कानके परिसरातून अटक करण्यात आली होती.

  • मंजर इमाम हा रांची विद्यापीठात (Ranchi University) उर्दूमध्ये टॉपर होता. 2007 मध्ये रांची विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं, तर दानिश रियाझ सायबराबादमधील एका आयटी कंपनीत कामाला होता. दोघंही रांचीमधील बरियातू येथील जोदा तालाबमधील रहिवासी आहेत.

  • अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) बॉम्बस्फोट प्रकरणी 20 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. यानंतर सुरतमध्ये आणखी 15 एफआयआर नोंदवण्यात आले. या स्फोटांबाबत राज्य सरकारनं कडक भूमिका घेतली होती. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) होते.

  • या धक्कादायक घटनेच्या तपासासाठी पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. पोलिसांनी छापा टाकून 19 दिवसांत 30 आरोपींना अटक करून कारागृहात पाठवलं होतं. या प्रकरणाचा आज 13 वर्षांनी निकाल आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT