गुजरातमधील अहमदाबाद न्यायालयाने मंगळवारी (6 डिसेंबर) तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गोखले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोरबी ब्रिज दुर्घटनेबद्दल ट्विट केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली.
सहाय्यक पोलिस आयुक्त (सायबर गुन्हे) जितेंद्र यादव यांनी मंगळवारी सांगितले की, एका व्यक्तीकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, पंतप्रधानांच्या मोरबी दौऱ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल गोखले यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना साकेत गोखले यांचे समर्थन केले आणि भाजप सरकारच्या सूडखोर वृत्तीचा निषेध केला. मंगळवारी राजस्थान दौऱ्यावर गेलेल्या ममता बॅनर्जी यांनी गोखले यांनी कोणतीही चूक केली नसल्याचा दावा केला.
हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
ममता बॅनर्जी यांचा गोखलेंना पाठिंबा
जयपूर विमानतळावर ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले की, हे अतिशय वाईट आणि दुःखद (घटना) आहे. साकेत गोखले हे प्रतिभावंत आहेत. तसेच ते सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. या सूडबुद्धीच्या वृत्तीचा मी निषेध करते, असे त्या म्हणाल्या. साकेत यांनी पंतप्रधानांविरोधात ट्विट केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. लोक माझ्याविरोधातही ट्विट करतात असेही त्यांनी म्हटले.
गुजरात पोलिसांनी केली होती अटक
गुजरात पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे (TMC) प्रवक्ते साकेत गोखले यांना मंगळवारी राजस्थानमधील जयपूर येथून एका ट्विटमुळे अटक केली. एका ट्विटमध्ये त्यांनी पूल दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्याशी संबंधित कथित खोट्या बातम्यांचे समर्थन केल्याचा आरोप आहे. मोरबीमध्ये पूल कोसळून 135 जणांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.