shah rukh khan , pathaan, deepika padukon SAKAL
देश

Pathaan Release : शाहरुखला दिलासा! 'यामुळे' विहिंप, बजरंग दलाचा 'पठाण'ला असलेला विरोध मावळला

विहिंप आणि बजरंग दलाने त्याला विरोध केला होता

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध करणार नसल्याचे जाहीर केले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटातील गाण्याचे वादग्रस्त बोल आणि दृश्ये काढून टाकण्यात आले आहे. आता हे गाणे पाहायचे की नाही याचा निर्णय दोन्ही संघटनांनी प्रेक्षकांवर सोडला आहे. अभिनेता शाहरुख खानला हा मोठा दिलासा मानला जात आहे. (Pathaan Release news in Marathi)

या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुजरात सरकारने मल्टिप्लेक्सच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. विहिंपचे राज्य मंत्री अशोक भाई रावल यांनी एका निवेदनात म्हटले की, अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या पठाण चित्रपटातील गाण्यातील काही दृश्ये आणि बोलांवर हिंदू समाजाचा आक्षेप होता. विहिंप आणि बजरंग दलाने त्याला विरोध केला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटातील गाण्याचे वादग्रस्त बोल आणि सीन काढून टाकण्यात आले आहेत.

अशोकभाई रावल म्हणाले की, चित्रपट निर्माते, थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालक हे चित्रपटसृष्टीचे भागीदार आहेत, परंतु त्यांनी धर्म, संस्कृती आणि देशाचा आदर लक्षात घेऊन अशा चित्रपटांना विरोध केल्यास विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागणार नाही. हा चित्रपट पाहायचा की नाही याचा निर्णय आता प्रेक्षकांनी घ्यायचा आहे, असे रावल यांनी सांगितले.

अलीकडेच गुजरात मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनने राज्य सरकारकडे मल्टिप्लेक्स आणि थिएटर्सचे संरक्षण करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री हर्ष संघवी यांनी असोसिएशन, मल्टिप्लेक्स आणि थिएटर मालकांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिस महासंचालक आशिष भाटिया यांनी ही मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सूचना जिल्हा आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT