Asaduddin Owaisi esakal
देश

देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचंही योगदान, टिपू सुलतानचं बलिदान विसरू शकत नाही : ओवैसी

'ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांना कसं विसरता येईल?'

सकाळ डिजिटल टीम

'ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांना कसं विसरता येईल?'

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नुकतंच हैदराबादमध्ये (Hyderabad) एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी ओवैसींनी भारताच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांच्या (Muslim) भूमिकेचा उल्लेख केला. 1947 च्या युद्धात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, असंही ओवैसी म्हणाले.

याआधीही देशात अनेक लढाया झाल्या, यात मोठ्या संख्येनं लोकांचे प्राण गेले. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांना कसं विसरता येईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एमआयएम प्रमुख पुढं म्हणाले, 1857 मध्येही युद्ध झालं होतं. याशिवाय, देशात अनेक युद्धं झाली. या देशाच्या स्वातंत्र्यात आपल्या धर्माच्या (मुस्लिम) लोकांचंही मोठं योगदान आहे. सिराजुद्दौला आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचं बलिदान आपण कसं काय विसरू शकतो? असा सवालही त्यांनी केलाय.

दरम्यान, 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार अमृत महोत्सवही (Amrit Festival) साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सरकारनं हर घर तिरंगा अभियानही (Har Ghar Tiranga Abhiyan) सुरू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

Latest Maharashtra News Updates : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा, ४५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT