AIMIM on INDIA Alliance:२०२४च्या निवडणुकांमध्ये मोदी सरकार आणि भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीत २९ पक्ष सामील झाले. मात्र, AIMIM पक्ष यामध्ये सामील झाला नाही. यावर AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी इंडिया आघाडीबद्दल वक्तव्य केलंय.
इंडिया आघाडीत नसल्याने फरक पडत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबरच्या बंद दाराआड चर्चेचा देखील खुलासा केला. यावेळी त्यांनी राहुल गांधींना वायनाडमधून विजय कोणामुळे मिळाला याचंही स्पष्टीकरण दिलं.
एएनआय वृत्तसंस्थेने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात AIMIM असदुद्दीन औवेसी म्हणाले की, "आम्ही इंडिया आघाडीत नाही आणि याचा मला काही फरक पडत नाही. तिथे गुदमरल्यासारखे होतं. ते त्यांच्या विचारधारेवर भाजपच्या विरोधात का उभे राहत नाहीत. ते बंद दाराआड झालेल्या चर्चेत म्हणतात की तुम्हाला तिकीट दिलं तर आम्हाला हिंदु मतं मिळणार नाहीत.
यापुढे औवेसी म्हणाले की, " राहुल गांधी अमेठीत हरले पण वायनाडमध्ये जिंकले. असदुद्दीन ओवेसी तिथं निवडणूक लढले नाहीत. तिथे माझा भाजपशी कोणताही व्यवहार नव्हता. तो वायनाडमधून जिंकला कारण तिथे मुस्लिम लीग आहे. मुस्लिम लीगने त्याला बुडण्यापासून वाचवले..."(Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.