aimim on Opposition Party Meet in bengaluru says we are political untouchable slam Uddhav thackeray Nitish kumar bjp  Sakal
देश

Opposition Party Meet : 'नितीश-उद्धव अचानक सेक्युलर झाले…', AIMIM ची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका

रोहित कणसे

AIMIM Party News : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी १८ जुलै रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक पार पडली. बैठकीला असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) सहभागी झाला नाही.

त्यानंतर एआयएमआयएमने बंगळुरू येथे झालेल्या या बैठकीवर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी, त्यांनी (विरोधी पक्षांनी) आम्हाला बोलवला नाही, त्यांच्यासाठी आम्ही राजकीय अस्पृश्य आहोत अशी प्रतिक्रिया दिली.

पठाण म्हणाले की, त्या बैठकीला नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि महबूबा मुफ्ती देखील सहभागी झाले, हे एकेकाळी भाजपसोबत सत्तेत सहभागी होते. हे सगळे अचानक सेक्युलर झाले आहेत. केजरीवाल देखील आहेत ज्यांनी गुजरात निवडणुकीत सतत शिव्या घालून काँग्रेसला पराभव पत्करायला लावला आणि आता त्यांच्यात सोबत जाऊन बसले आहेत. ते देखील सेक्युलर झाले आहेत.

एआयएमआयएम प्रवक्त्याने त्यांच्या पक्षांना विरोधकांनी एकटं पाडल्याचा आरोप केला. विरोधकांचे म्हणणे आहे की संविधान वाचवायचे आहे, लोकशाहीचे संक्षण करायचे आणि भाजपला पराभूत करायचे आहे. आमचे ध्येय देखील हेच आहे की कुठल्याही परिस्थीतीत भाजपला पराभूत करून २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू नयेत. मग तुम्ही (विरोधक) आमच्याकडे दुर्लक्ष कसे करू शकतात, असेही पठाण म्हणाले.

भाजपची बी कोण टीम?

एआयएमआयएम नेत्याने आरोप केला की, विरोधकांना मुस्लिम समाजाची मते हवी आहेत पण मुस्लिमांचे प्रतिनिधित्व नको आहे. आम्हाला सगळे भाजपती बी टीम म्हणतात. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सर्वांनी खरंच कोण भाजपची बी टीम आहे ते पाहिलं असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT