नवी दिल्ली : तामिळनाडूच्या त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात IX613 तांत्रिक बिघाड झाल्यानं पायलटच्या सुचनेनुसार तिरुचिलापल्ली एअरपोर्टवर इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. पण हवेत २ तास घिरट्या घातल्यानंतर विमानाचं पुन्हा त्रिची एअरपोर्टवर सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. या विमानात १४० प्रवाशी प्रवास करत होते.
माध्यमांतील वृत्तांच्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानानं त्रिची एअरपोर्टवरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळं या आपत्कालिन परिस्थितीची माहिती पायलटनं एटीसीला दिली. त्यानंतर विमान पुन्हा मागे फिरवण्याच्या सुचना एटीसीनं पायलटला दिल्या.
त्यानुसार, त्रिची एअरपोर्टवर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. त्यानंतर विमानातील इंधन कमी करण्यासाठी विमानाला तब्बल दोन तास हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. या विमानातून १४० प्रवाशी प्रवास करत होते. यापार्श्वभूमीवर लँडिंगवेळी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्रिची विमानतळावर २० पेक्षा अधिक अॅम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाया गाड्या तैनात करण्यात आल्या. एअरपोर्टचे संचालक गोपालकृष्णन यांनी ही माहिती दिली आहे.
विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली होती. पण अखेरिस विमानातील इंधन कमी झाल्यानं एअरपोर्टवर ते सुरक्षितरित्या उतरु शकतं. या विमानातून प्रवास करणारे सर्व १४० प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.